spot_img
आरोग्यWeight loss tips : वजन कमी करायचंय ? मग 'अशा' पद्धतीने खा...

Weight loss tips : वजन कमी करायचंय ? मग ‘अशा’ पद्धतीने खा आले , झटपट होईल वेट लॉस

spot_img

health tips : आले अर्थात अद्रक हे आपण सर्वाना माहित आहे. आले हे अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. त्याचा आरोग्यास खूप फायदा होतो. हे आपल्या जेवणाची चव तर वाढवतेच शिवाय वजन कमी करण्यासाठीही हे उपयुक्त आहे.

जर आपण वजन कमी करण्यासाठी डाईट प्लॅन घेत असाल तर त्यात तुम्ही अद्रकचा समावेश करू शकता. याचा वापर करून तुम्ही लवकर वजन कमी करू शकता. आल्याचा उपयोग घरगुती उपाय म्हणून विशेषत: सर्दी आणि खोकल्यावर केला जातो, परंतु यामुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते. वजन नियंत्रित करण्यासाठी आल्याचा वापर कसा करता येईल ते जाणून घेऊया.

आल्याचा चहा
ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी आल्याचा चहा खूप फायदेशीर ठरू शकतो. वजन कमी करण्यासाठी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी नियमितपणे चहा पिऊ शकता. या चहामध्ये लिंबाचा रसही मिसळता येतो. वजन कमी करण्यासाठी लोक अनेकदा सकाळची सुरुवात लिंबू पाण्याने करतात. अशावेळी तुम्ही गरम पाण्यात लिंबाचा रस व आल्याचा रस मिसळून दररोज सकाळी डिटॉक्स ड्रिंक म्हणून पिऊ शकता.

स्मूदी
वजन कमी करण्यासाठी तुम्ही आल्याची स्मूदी देखील ट्राय करू शकता. हे बनवण्यासाठी फळे, भाज्या आणि आल्याचा वापर केला जाऊ शकतो. यामुळे पोट भरलेले राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

कॅन्डीज
आल्याच्या कॅंडी चवीला उत्कृष्ट असतात आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. वजन कमी करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. हे करण्यासाठी, अदरक चे जाड तुकडे करा. हे तुकडे एका भांड्यात ठेवा, नंतर मीठ, अमचूर पावडर, काळी मिरी पावडर आणि लिंबाचा रस घाला. हे मिश्रण थोडा वेळ असेच ठेवा. नंतर उन्हात वाळवा.

आले पावडर
आले जितके प्रभावी तितकेच आल्याची पावडरही फायदेशीर असते. यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही आल्याच्या पावडरची मदत घेऊ शकता. आपण ते पाण्यात मिसळू शकता किंवा अन्नपदार्थत मिसळून खाऊ शकता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अभिनेत्री कंगनाची पोस्ट चर्चेत, महिलांना पुरुषांची गरज पण…

मुंबई। नगर सहयाद्री अभिनेत्री कंगना रनौत कायम चर्चेत असते. आता देखील तिने एक पोस्ट शेअर...

काका अजित पवारांचा पुतण्या रोहित पवारांवर मोठा राजकीय वार ! घणाघाती टीका

कर्जत / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत सरकारमध्ये...

सोने खरेदी करताना बिलाचे महत्व काय? खरे बिल कसे असावे? जाणून घ्या

नगर सह्याद्री टीम : सोन्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. गुंतवणुकीसाठी अनेक लोक सोने खरेदी...

शेतकऱ्यांना मालामाल करेल ‘ही’ वनस्पती, शेकडो महिलांनी कमवलेत लाखो रुपये

नगर सह्याद्री टीम : Lemongrass Farming : प्रत्येकाला कमी खर्चात चांगला नफा मिळवायचा असतो आणि...