spot_img
ब्रेकिंगधक्कादायक! चाललंय तरी काय? आमदार समर्थकाची 'त्या' चौफुलीवर हत्या

धक्कादायक! चाललंय तरी काय? आमदार समर्थकाची ‘त्या’ चौफुलीवर हत्या

spot_img

जालना । नगर सहयाद्री-
जालन्यात गुन्हेगारी वाढली आहे. या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात आहेत. अनेक गुन्हेगारांवर कारवाई झाली. तरी देखील माजी आमदार समर्थकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

काल भरदिवसा जालन्यातील मंठा चौफुलीवर कारला आडवे येत ३ आरोपींनी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली. गजानन मच्छिंद्रनाथ तौर असे मृताचे नाव आहे. माजी आमदार अर्जुन खोतकर यांचा तो समर्थक मानला जात होता.

गजानन तौर आपले काम आटोपून कारने जालन्याकडे येत असताना मंठा चौफुली येथे त्याची गाडी ५ जणांनी अडवली. तौर खाली उतरून त्या तरुणांशी चर्चा करत होता. याच वेळी पाचपैकी तीन आरोपींनी पिस्तुलातून त्याच्यावर गोळ्या झाडल्या.

दरम्यान, रक्तबंबाळ तौर यास तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांपैकी लक्ष्मण गोरे याला अटक केली असून आणखी दोन अनोळखींचा आरोपींमध्ये समावेश आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...

पोटची मुलगी गेली, भावाची मुलगी मारली; पारनेरमध्ये चुलत्याकडून पुतणीचा खून!

पारनेर । नगर सहयाद्री :- जुन्या रागातून चुलत्याकडून १६ वर्षीय मुलीचा डोयात दगड घालून...

औरंगजेबाविषयी गौरवोद्गार; निघोजमध्ये तणाव; नेमकं काय घडलं?

निघोज । नगर सहयाद्री:- पाच महिन्यापूर्वी येथील एका कुटुंबातील १६ वर्षीय युवकाने औरंगजेबाविषयी गौरवोद्गार...