spot_img
ब्रेकिंगAditya Thackeray News: आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार? 'त्या' प्रकरणी SIT स्थापन

Aditya Thackeray News: आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार? ‘त्या’ प्रकरणी SIT स्थापन

spot_img

मुंबई। नगर सह्याद्री-

राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिशा सालियान मृत्यू प्रकरणात राज्य सरकारकडून आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी केली जाणार असून राज्य सरकारकडून लेखी आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियान हिचा ८ जून २०२० ला रोजी मृत्यू झाला होता. पण, तिची हत्या झाली असा संशय व्यक्त करत आरोप करण्यात आला होता. दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नेमके आदित्य ठाकरे त्यावेळी कुठे होते? असा प्रश्न अनेक आमदारांकडून सातत्यानं उपस्थित करण्यात आला होता.

दिशाच्या मृत्यू प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली होती. या प्रकरणी शिंदे सरकारकडून SIT चौकशी केली जाणार असून राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश जारी करण्यात आले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....