spot_img
ब्रेकिंगधक्कादायक! चाललंय तरी काय? आमदार समर्थकाची 'त्या' चौफुलीवर हत्या

धक्कादायक! चाललंय तरी काय? आमदार समर्थकाची ‘त्या’ चौफुलीवर हत्या

spot_img

जालना । नगर सहयाद्री-
जालन्यात गुन्हेगारी वाढली आहे. या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात आहेत. अनेक गुन्हेगारांवर कारवाई झाली. तरी देखील माजी आमदार समर्थकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

काल भरदिवसा जालन्यातील मंठा चौफुलीवर कारला आडवे येत ३ आरोपींनी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली. गजानन मच्छिंद्रनाथ तौर असे मृताचे नाव आहे. माजी आमदार अर्जुन खोतकर यांचा तो समर्थक मानला जात होता.

गजानन तौर आपले काम आटोपून कारने जालन्याकडे येत असताना मंठा चौफुली येथे त्याची गाडी ५ जणांनी अडवली. तौर खाली उतरून त्या तरुणांशी चर्चा करत होता. याच वेळी पाचपैकी तीन आरोपींनी पिस्तुलातून त्याच्यावर गोळ्या झाडल्या.

दरम्यान, रक्तबंबाळ तौर यास तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांपैकी लक्ष्मण गोरे याला अटक केली असून आणखी दोन अनोळखींचा आरोपींमध्ये समावेश आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! ड्युटीवर असताना एसटी चालक व वाहक दारूच्या नशेत! पुढे घडलं असं काही..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राज्य परिवहन महामंडळाच्या नियमावलीचा भंग करत अहिल्यानगर येथे एक धक्कादायक...

आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशींसाठी खास तर काही राशींना त्रासदायक ‘सोमवार’

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी, अपंगत्वाशी सामना...

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...