अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आठव्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या स्थावर मालत्तेत तब्बल 1.79 कोटी रूपयांची घट झाली आहे.
परंतु पत्नी शालीनी विखेंच्या संपत्तीत 81.35 लाखांनी स्थावर तर 2.4 कोटींनी जंगम मालमत्तेत वाढ झाली. मंत्री विखेंच्या नावावर एकही चार चाकी गाडी नाही. मंत्री विखेंकडे 550 ग्रॅम सोने असून त्यांच्या पत्नी शालीनी विखेंकडे 1150 ग्रॅम सोने असल्याचे नमूद केले आहे.
राधाकृष्ण विखे पाटलांच्या संपत्तीत घट, जाणून घ्या किती आहे एकूण मालमत्ता
2019 च्या तुलनेत 2024 मध्ये संपत्तीत मालमत्तेतील वाढ झाली की घट?
2019 : वाहन – एकही नाही.
स्वतःकडे सोने – 550 ग्रॅम.
पत्नीकडे सोने – 1150 ग्रॅम.
स्वतःकडे स्थावर मालमत्ता – 13 कोटी 14 लाख 74 हजार 48
जंगम मालमत्ता – 4 कोटी 69 लाख 78 हजार 672
पत्नीकडे स्थावर मालमत्ता – 2 कोटी 18 लाख 10 हजार पाचशे 80
जंगम मालमत्ता – 4 कोटी 75 लाख 62 हजार 979
2024 : वाहन – एकही नाही
स्वतःकडे सोने – 550 ग्रॅम
पत्नीकडे सोने – 1150 ग्रॅम
स्वतःकडे स्थावर मालमत्ता – 11 कोटी 35 लाख 39 हजार 820
जंगम मालमत्ता – 12 कोटी 74 लाख 82 हजार 160
पत्नीकडे स्थावर मालमत्ता – 2 कोटी 99 लाख 45 हजार 610
पत्नीकडे जंगम मालमत्ता – 6 कोटी 79 लाख 82 हजार 505
राधाकृष्ण विखे पाटलांच्या संपत्तीत घट, जाणून घ्या किती आहे एकूण मालमत्ता
राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडील संपत्ती घाट झाली असून त्यांची स्थावर मालमत्ता एकूण 1 कोटी 79 लाख 34 हजार 228 आहे, तर जंगम मध्ये वाढ 8 कोटी 5 लाख 3 हजार 488 रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच त्यांच्या पत्नीकडे स्थावर मालमत्तेत 81 लाख 35 हजार 30 रुपयांनी वाढ झाली तर. तर जंगम मालमत्तेतही 2 कोटी 4 लाख 19 हजार 526 रुपयांनी वाढ झाली.