India- Pakistan War: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर हल्ला केला. मात्र पाकिस्तनाचा हा डाव भारताने उधळून लावला आहे. काल रात्री 15 लष्करी तळांवर पाकिस्तानचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावल्यानंतर, भारतीय लष्कराने आता एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना भारतीय लष्कराने योग्य उत्तर दिल्याचे लष्कराने म्हटले आहे.
भारतीय लष्कराने आपल्या निवेदनात, 8 आणि 9 मे 2025 च्या मध्यरात्री पश्चिम सीमेवर पाकिस्तानी सशस्त्र दलांनी ड्रोन आणि इतर दारूगोळ्यांचा वापर करून अनेक हल्ले केले. याशिवाय, जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानने अनेक वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले. असे म्हटले आहे. तसेच पुढे निवेदनात,भारतीय सैन्याने हे ड्रोन हल्ले प्रभावीपणे हाणून पाडले. युद्धबंदी उल्लंघनांना प्रत्युत्तर म्हणून योग्य ती कारवाई केली. भारतीय लष्कर देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. कोणत्याही चुकीच्या कृतीला कडक प्रत्युत्तर दिले जाईल. असेही म्हटले.
गुरुवारी रात्री पाकिस्तानने नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अनेक ठिकाणी एकाच वेळी ड्रोन हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल, भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण तुकड्यांनी उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठाणकोट सारख्या भागात मोठी कारवाई केली आणि 50 हून अधिक ड्रोन पाडले. या काळात आधुनिक शस्त्रांचा वापर करण्यात आला.
दिल्लीत अलर्ट ; लाल किल्ला, कुतुबमिनारसह ऐतिहासिक इमारतींची सुरक्षा वाढवली
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार, लाल किल्ला आणि कुतुबमिनारसह राष्ट्रीय राजधानीतील ऐतिहासिक इमारती आणि इतर इमारतींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्लीतील लोकांची, सरकारी आणि गैर-सरकारी संस्थांची कार्यालये, ऐतिहासिक इमारती आणि इतर आस्थापनांची सुरक्षा लक्षात घेऊन सरकारने सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाअंतर्गत, दिल्ली पोलिसांनी लाल किल्ला, कुतुबमिनारजवळ पोलिस दलाची तैनाती वाढवली आहे. ऐतिहासिक इमारतींजवळ मोठ्या संख्येने लोक जमत असल्याने, खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
देशाच्या किनारपट्टीवर पोलिस अलर्ट मोडवर
दहशतवाद्यांवर भारताने एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. पाकिस्तानी सैन्याने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून आगळीक करत प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर तणावाची स्थिती आहे. तर, दुसरीकडे भारतातील महत्त्वाच्या राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणपट्टीवर पोलिसांच्या हालचाली वाढल्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये पोलिस यंत्रणा सावध झाली आहे. मुंबईसह कोकणपट्टी आणि गोवा, बेळगाव जिल्ह्यात पोलिस अलर्ट मोडवर आहेत. सिंधुदुर्गातील सर्व चेक पोस्ट अलर्ट ठेवले आहेत. ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीन मत्स्य विभागाचे पथक किनारपट्टीवरील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहे. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर रायचूर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प, कैगा अणुऊर्जा प्रकल्प आणि कृष्णराजसागर जलाशयासह अनेक ठिकाणची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. गोव्यात नौदल तळ असून आयएनएस मांडवी आणि आयएनएस हंसावरून अरबी समुद्रावर संपूर्ण नियंत्रण रहाणार आहे.
आयपीएल 2025 स्थगित: 16 सामने लांबणीवर
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या संबंधांमुळे बीसीसीआयने खश्रि 2025 डीशिपीळेप करण्याचा निर्यण घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव गुरूवारचा पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे त्यानंतर आयपीएलचे सामने होणार की नाहीत असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र आता इउउखने सर्व संघ मालकांसोबत चर्चा करून आयपीएल तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामना रद्द करण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणांमुळे ब्लॅकआऊटची घोषणा करण्यात आली होती. प्रेक्षकांना तातडीने स्टेडियममधून बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे पुढील सामना होणार की नाही याबाबत साशंकता होती.
भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील धर्मशाला येथे खेळवला जाणारा सामना आधीच अहमदाबादला हलवण्यात आला होता. मात्र आता आयपीएलचे पुढील सामने तूर्तास खेळवले जाणार नाहीत. खझङ 2025 चे आतापर्यंत 57 सामने झाले असून 16 सामने बाकी आहेत. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आज होणारा आरसीबी आणि लखनऊनमधील सामना होणार की नाही याबाबत शंका होती. मात्र आता बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण आयपीएल स्पर्धा तूर्तास थांबवण्यात आली आहे.
पुण्यातील प्रशासन अलर्ट मोडवर!
भारत आणि पाकिस्तान या दोन देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकला ॲापरेशन सिंदूर अंतर्गत चोख प्रत्युत्तर देत हवाई हल्ले केले आहेत. यामुळे पाकिस्तानची अशरक्ष: दाणादाण उडाली आहे. भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर खरदारीचा उपाय म्हणून भारतात सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी देखील सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे. पुण्यात देखील प्रशासन अलर्ट मोडवर असून पुणे विमानतळावरील अनेक विमानांची उड्डाने रद्द करण्यात आली आहे. तसेच शहरातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दगडूशेठ मंदिर परिसरात स्पेशल पोलीस विभागाचे कमांडो तैनात करण्यात आले आहेत. तसेच दंगल नियंत्रण पथक देखील तैनात करण्यात आले आहे. भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभुमीवर सुरक्षेच्या कारणास्तव मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यासोबच वैद्यकीय सेवा देखील अलर्ट मोडवर आहेत. सर्व डॉक्टर व वैद्यकीय संस्थांना स्थानिक यंत्रणासोबत समन्वय ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. औषधे, खाटा तसेच अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरेसा साठा ठेवा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.भारताची पाकिस्तावर कारवाई करण्याचे सत्र सुरूच असून पाकिस्तानने केलेले 50 ड्रोन हल्ले भारताने हाणून पाडले आहेत. या कारवाईचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भारताकडून 100 हून अधिक क्षेपणास्त्र पाकिस्तानवर डागण्यात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घराजवळच ड्रोन हल्ला केला आहे.
सिद्धिविनायक मंदिरात हार, नारळ अर्पण करण्यास मनाई
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत जोरदार एअरस्ट्राईक केला. यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त करण्यात आले. यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या 15 शहरांवर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला. भारत-पाकिस्तानात सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कता बाळगली जात आहे. याचाच भाग म्हणून मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराने मोठा निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव येत्या रविवारपासून भाविकांना हार आणि नारळ अर्पण करण्यास मनाई केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत अधिकृत माहिती मंदिर प्रशासनाकडून लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. या निर्णयाला भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे, त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.
मुंबई एअपोर्टवर पहाटे ड्रोनच्या घिरट्या
भारत आणि पाकिस्तान या दोन देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकला ॲापरेशन सिंदूर अंतर्गत चोख प्रत्युत्तर देत हवाई हल्ले केले आहेत. यामुळे पाकिस्तानची अशरक्ष: दाणादाण उडाली आहे. भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर खरदारीचा उपाय म्हणून भारतात सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी देखील सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे. असं असताना आता मु्ंबईच्या साकिनाका परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ड्रोन दिसल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली. साकीनाका परिसरातील हजरत तय्यद जलाल (बैगन शाहा दर्गा) मशिदीच्यावर ड्रोन फिरत आहे. दरम्यान, काही वेळाने हा ड्रोन झोपडपट्टी भागात नाहीसा झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केले असून, ड्रोन उडवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.