spot_img
अहमदनगरAhmednagar Crime: नगरमध्ये चाललंय काय? पक्षकाराचा वकिलावर प्राणघातक हल्ला!

Ahmednagar Crime: नगरमध्ये चाललंय काय? पक्षकाराचा वकिलावर प्राणघातक हल्ला!

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
जिल्ह्यात वकील दांपत्याच्या खुनाची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एका पक्षकाराने वकिलावर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. अ‍ॅड. अशोक सखाराम कोल्हे (वय ५४, रा. लोणी हवेली, ता. पारनेर जि,. अहमदनगर) असे जखमी वकिलाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांच्या पथकाने पक्षकारास ताब्यात घेतले आहे. अनिल गायकवाड (रा. नगर) असे हल्ला करणार्‍या संशयित पक्षकाराचे नाव आहे.

अधीक माहिती अशी: नेहमीप्रमाणे अ‍ॅड. मयूर अशोक कोल्हे व त्यांचे वडील अ‍ॅड. अशोक कोल्हे कामकाजा निमित्ताने शहरातील जुन्या न्यायालयात आले होते. न्यायालयाच्या आवारात असताना त्यांचा पक्षकार अनिल गायकवाड याने कारण नसताना तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणुन हातात असलेल्या धारधार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. अ‍ॅड. कोल्हे यांच्या डाव्या गालावर तसेच डोक्याला गंभर दुखापत झाली आहे. वकिलांनी व परिसरातील स्थानिक नागरिकांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व पथकाने घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकाचे सपोनि योगिता कोकाटे, पो.कॉ. तानाजी पवार, सुरज कदम, सुजय हिवाळे यांना घटनास्थळी पाठवून आरोपीस ताब्यात घेण्याचे सांगितले. पथकाने घटनेची माहिती माहिती घेतली. अ‍ॅड. अशोक कोल्हे यांचेवर हल्ला करणारा त्यांचा पक्षकार असुन अनिल लक्ष्मण गायकवाड (रा. हनुमान मंदीराचे पाठीमागे, गांधीनगर, बोल्हेगाव) असल्याचे समजले. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने तो पळुन गेला तर लवकर मिळून येणार नाही याकरिता पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या आदेशाप्रमाणे गुन्हे शोध पथकाने आरोपीस बोल्हेगाव परिसरातून ताब्यात घेतले. सदर घटणेबाबत अ‍ॅड. अशोक कोल्हे यांचा मुलगा अ‍ॅड. मयूर अशोक कोल्हे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अनिल लक्ष्मण गायकवाड याचे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास सपोनि योगिता कोकाटे करित आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, गुन्हे शोध पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, पो. कॉ.तानाजी पवार, पो.कॉ. दिपक रोहोकले, सत्यजित शिंदे, सुरज कदम, सुजय हिवाळे यांनी केली आहे.

वकिलांवरील हल्ले चिंताजनक
नगर येथे न्यायालयाच्या आवारातच अ‍ॅड अशोक कोल्हे यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर नगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. काही दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारे राहुरी येथील अ‍ॅड राजाराम आढाव व त्यांच्या वकील पत्नी यांची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण घडले होते. कायद्याची सेवा आणि रक्षण करणार्‍यांवर अशा पद्धतीने होणारे हल्ले अतिशय चिंताजनक असल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार नीलेश लंके, माजी महापौर अभिषेक कळमकर, शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अ‍ॅड. सुरेश लगड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राष्ट्रवादी विधानसभेला एकत्र लढणार की स्वबळावर? मोठी माहिती आली समोर..

मुंबई। नगर सहयाद्री विधानसभेच्या पाश्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून रणनीती आखण्यास सुरवात झाली आहे. शिवसेना पक्षाचे...

का झाला शिर्डीत पराभव? माजी खा. लोखंडे यांनी स्पष्टच सांगितले ‘कारण’

अहमदनगर | नगर सह्याद्री अयोध्येत बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरांचा भाजपला राजकीय फायदा होणार असे गणित...

शिक्षक विधानपरिषद निवडणुकीत ‘हे’ तालुके ठरणार ‘निर्णायक’, कुणाला मिळणार आघाडी? वाचा सविस्तर..

अहमदनगर । नगर सहयाद्री- विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २६ तारखेला मतदान...

महायुतीला वेध लागले मंत्रिमंडळ विस्ताराचे? नगरमधून ‘यांच्या’ नावांची जोरदार चर्चा

मुंबई । नगर सहयाद्री- लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर विधानसभेला सामोरे जाण्यापूर्वी राज्यात महायुतीला मंत्रिमंडळ विस्ताराचे...