spot_img
अहमदनगरAhmadnagar Politics: १३ तारखेला विरोधकांचे १२ वाजवा! संगमनेरात मुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर...

Ahmadnagar Politics: १३ तारखेला विरोधकांचे १२ वाजवा! संगमनेरात मुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री
संगमनेर येथे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ महायुतीची संकल्प सभा पार पडली. अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर उभारणी असेल,जम्मू काश्मीर मधील ३७० कलम हटवणे असेल हे सर्व हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न नरेंद्रजी मोदी आणि अमितजी शाह यांनी पूर्ण केले आहे. उबाठा हे बाळासाहेबांचे विचार विसरले असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

बुधवार (दि.०८) रोजी संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ महायुतीची संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे, माजीमंत्री बबनराव घोलप, माजी खासदार आनंद आडसूळ, माजी आमदार वैभव पिचड, यवतमाळ-वाशिम येथील महायुतीच्या उमेदवार जयश्री पाटील,ज्योती वाघमारे,संजीव भोर,जालिंदर वाकचौरे, अमोल खताळ,कपील पवार,अॅड. श्रीराज डेरे, कमलाकर कोते, आबासाहेब थोरात, रमेश काळे,सोमनाथ भालेराव,जावेद जहागिरदार,सरूनाथ उंबरकर, वैभव लांडगे, कैलास कासार आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचा अतोनात छळ करणाऱ्या औरंगजेबाचे नाव असलेल्या गावाचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या विरोधात कोर्टात गेलेल्या लोकांना मतदान करू नका. शरद पवार यांनी सर्व प्रादेशिक पक्षाचे काँग्रेस मध्ये विलीनीकरण करण्याचे आवाहन केले आहे.

परंतु वंदनीय बाळासाहेबांचे विचार विसरलेले उबाठा आगोदरच काँग्रेस मध्ये विलीन झाली आहे. यांनी खुर्चीसाठी कमरेवरचे काढले आणि डोक्याला बांधले. गर्व से कहो हम हिंदू है हे उबाठा आता बोलू शकत नाही. पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या काँग्रेसला येत्या १३ तारखेला यांचे १२ वाजवा आणि धनुष्यबाण रामाचा, लोखंडे आपल्या कामाचा असे उद्गार काढत महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....