spot_img
अहमदनगरअहमदनगरमध्ये चाललंय काय ! भर चौकात गावठी कट्टा लावला, अन...

अहमदनगरमध्ये चाललंय काय ! भर चौकात गावठी कट्टा लावला, अन…

spot_img

नेवासे / नगर सहयाद्री : अहमदनगर मधून अनेक धक्कादायक घडामोडी सातत्याने समोर येत आहेत. अनेक गुन्हेगारी घटना देखील सातत्याने घडत आहेत.

आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दारूसाठी पैसे न दिल्याने एकास गावठी कट्टा लावून जिवे मारण्याची धमकी दिलीये. ही घटना नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील घोडेगाव सोनई चौकात भर दुपारी घडली. निलेश मधुकर केदारी असे आरोपीचे नाव आहे.

मंगळवार (14 नोव्हेंबर) रोजी फिर्यादी रामदास जाधव घरी निघाले असताना आरोपी निलेश हा मोटारसायकलवर घरासमोर आला व फिर्यादीस दारु पिण्यासाठी पैशाची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपी केदारी याने फिर्यादीस शिवीगाळ केली.

त्यानंतर फिर्यादी यांच्या दुचाकीला आरोपीने त्याच्या दुचाकीने धडक दिली. तेव्हा दोघेही खाली पडल्याने किरकोळ दुखापत झाली. त्यातंर आरोपीने फिर्यादीस मारहाण केली.

त्यांच्या खिशातील 5200 रुपये चोरून नेले. तसेच आरोपीने गावठी कट्टा काढून फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर राजकीय कुस्त्या लावण्यासाठी माहीर ; डॉ. सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले पहा…

  बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनच्या आखाड्याचा जिल्ह्यात नावलौकिक पारनेर | नगर सह्याद्री अंबिका माता यात्रा उत्सवा निमित्ताने...

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...