spot_img
अहमदनगरAhmadnagar Breaking : खासगी बस - ट्रकचा भीषण अपघात, १२ जखमी

Ahmadnagar Breaking : खासगी बस – ट्रकचा भीषण अपघात, १२ जखमी

spot_img

पारनेर / नगर सहयाद्री अहमदनगर पुणे महामार्गावरील वाघुंडे शिवारात खाजगी बस – ट्रकचा भीषण अपघात झाला. यात बारा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

आज शुक्रवारी ( दि.१७) पहाटे हा अपघात घडला. शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अहमदनगर पुणे महामार्गावर वाघुंडे गावच्या शिवारात माल वाहतूक ट्रक पुण्याकडून अहमदनगरच्या दिशेने जात होती. त्याच वेळी एक खाजगी बस प्रवासी घेऊन मुबईवरून छत्रपती संभाजी नगरला जात होती.

पहाटे पाच वाजता बस चालकाला पुढील ट्रकचा अंदाज न आल्याने बसचे ट्रकला पाठीमागून जोरात धडक बसली. यावेळी बसमधील प्रवासी झोपेत होते. यात बारा जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यात बसचालक हा गंभीर आहे. सुपा येथील खासगी रुग्णवाहिकेचा चालक सादिकभाई हे तातडीने धावून गेल्याने अपघातातील सर्व जखमींना वेळीच मदत मिळाली. या अपघातग्रस्त रूग्णांसाठी सादिकभाई देवदूत ठरल्याची चर्चा होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Parner: खासदार विखे शेतकऱ्यांच्या बांधावर! म्हणाले, शेतकऱ्यांना..

पारनेर। नगर सह्याद्री- तालुक्यातील महसूल व कृषी कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना पिकांचे पंचनामे करताना कोणत्याही अडचणी येऊ...

Ahmednagar: सैनिकाला मारहाण..; नगरच्या ‘या’ भागात ‘धक्कादायक’ प्रकार

अहमदनगर | नगर सह्याद्री- सैनिकाच्या पत्नी विषयी समाजात वाईट बोलून त्यांची बदनामी केली. याबाबत जाब...

‘महसूलमंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातुन तीन कोटी निधी’

सागर मैड यांची पत्रकार परिषदेत माहिती सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील सुपा गावात येत्या काळात...

…म्हणून प्राचीन काळात मातीच्या भांड्यांना महत्व, जाणून घ्या सविस्तर

नगर सहयाद्री टीम- प्राचीन काळात मातीच्या भांड्यांना फार महत्व दिले जात होते. बाजारात चककणारी व...