spot_img
अहमदनगरAhmednagar : मंत्री राधाकृष्ण विखे यांचे शरद पवारांबाबत गौप्यस्फोट, केले 'हे'...

Ahmednagar : मंत्री राधाकृष्ण विखे यांचे शरद पवारांबाबत गौप्यस्फोट, केले ‘हे’ खुले आवाहन

spot_img

 अहमदनगर / नगर सहयाद्री :
Ahmednagar Political News : सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण आरक्षण मुद्द्दा चांगलाच गाजला आहे. त्यावरून अनेक नेत्यांमध्ये आरोपाच्या फैरी झडल्या आहेत. परंतु आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मोठी तोफ डागली आहे. पवार यांनी आता एक मराठा, लाख मराठा, गर्वसे कहो हम मराठा है, अशी घोषणा द्यावी म्हणजे सर्वच प्रश्न मिटतील, अशी उपरोधिक टीकाच विखे यांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांचा कुणबी जातीचा दाखला दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर खुद्द शरद पवार यांनी माझी जात सर्वांना माहिती असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर पुन्हा राजकारण व राजकीय वक्तव्य होण्यास सुरवात झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या जातीचा उल्लेख असलेले काही कागदपत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावरून उलटसुलट चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. दिवाळीच्या दरम्यान, पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी सगळ्या देशाला माझ्या जातीबाबत माहित असल्याचे म्हणत अधिक भाष्य केले नाही.

त्यावर गुरूवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नगरमध्ये सांगितले, शरद पवार म्हणाले, मी कधीच जातीचे राजकारण केलं नाही.परंतु याचा धागा पकडत मंत्री विखे यांनी म्हटलंय की, आम्हाला आक्षेप असून त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी. शरद पवार यांनी एकदा सांगावे की ‘गर्व से हम मराठा आहे.

एकदा घोषणा देऊन टाकावी. एक मराठा लाख मराठा ही घोषणाही द्यावी, म्हणजे तो प्रश्न संपून जाईल असेही विखे-पाटील यांनी म्हटले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रति पंढरपूर पळशी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध : सुजित झावरे पाटील

आषाढी एकादशी निमित्त आरती व महापूजा; भाविकांची अलोट गर्दी/ पारनेर पोलीस प्रशासनाचा पळशी येथे...

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...