spot_img
अहमदनगरमी जे बोलतो ते फक्त..! खासदार विखेंचे 'ते' चॅलेन्ज आमदार लकें स्वीकारणार...

मी जे बोलतो ते फक्त..! खासदार विखेंचे ‘ते’ चॅलेन्ज आमदार लकें स्वीकारणार का?

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर निवडणुकीच्या प्रचारसभासाठी नेते मंडळी सज्ज झाली आहे. त्यातच नगर दक्षिणच्या लोकसभा निवडणुकीवर राज्याचे लक्ष लागले आहे महायुतीकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर त्याचा विरोधात महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दोन्ही पक्षाच्या नेते मंडळी प्रचारासाठी सज्ज झाली आहे. नुकतीच शहरात एक प्रचार सभा पार पडली. प्रचार सभेमध्ये आमदार जगताप यांनी खासदार सुजय विखे पाटील यांची संसदेतील काही भाषणे दाखवली. या व्हिडिओज मध्ये विखे पाटील यांनी कशा पद्धतीने हिंदी आणि इंग्रजीमधून भाषणे करत आपल्या लोकसभा मतदारसंघातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला गेला हे त्यांनी दाखवले.

दरम्यन याचा आधार घेत खासदारसुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना एक ओपन चॅलेन्ज दिलं आहे. मी जेवढी इंग्रजी बोललो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं आव्हान सुजय विखेंनी निलेश लंके यांना दिलं. निवडणुकीच्या रींगणात दिलेल्या सुजय विखे पाटलांच्या चॅलेन्जला निलेश लंके स्वीकारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शहरात ‘मुळशी पॅटर्न’; वाढदिवसाच्या दिवशी नेत्याचा निर्घृण खून

Maharashtra Crime News :सांगली शहरात एका थरारक आणि धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. सांगलीत...

शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात आज अंतिम सुनावणीला, वाचा अपडेट

मुंबई । नगर सहयाद्री शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील मालकी हक्काच्या वादावर आज (बुधवार)पासून...

शेतमजुराचा मुलगा क्लासवन अधिकारी!; दीपक विधातेची ‘एसीएफ’ पदावर निवड

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- कर्जत तालुक्यातील छोट्या चापडगाव या गावातून उगवलेली प्रेरणादायी कहाणी सध्या...

मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटात धनंजय मुंडेंच्या समर्थकाला अटक, तिसऱ्याला रात्री उशिरा उचलला

जालना । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट...