spot_img
देश'सर्वोच्च' निकालाचे स्वागत! अदानी यांची पोस्ट चर्चेत, 'या' प्रकरणात दिलासा

‘सर्वोच्च’ निकालाचे स्वागत! अदानी यांची पोस्ट चर्चेत, ‘या’ प्रकरणात दिलासा

spot_img

नवी दिल्ली-
अदानी आणि हिंडेनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि. ३) निकाल दिला आणि सेबीच्या तपासात हस्तक्षेप करण्यास नकार देत न्यायालयाने अदानी समूहाला मोठा दिलासा दिला. या प्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने सेबीच्या तपासाला न्याय दिला आणि प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सेबीला तीन महिन्यांची मुदत दिली आहे, असे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाने नोव्हेंबर २०२३ मध्ये आपला निर्णय राखून ठेवला होता.

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावर निकाल देताना सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने सांगितले, की सेबीने तपासात कोणतीही अनियमितता उघड केलेली नाही. २४ प्रकरणांची चौकशी करण्यास सांगितले होते. दोन प्रकरणांचा तपास अद्याप प्रलंबित आहे, जो सेबीला तीन महिन्यांत करण्यास सांगितले आहे. यापूर्वी २४ नोव्हेंबरला या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने बाजार नियामक सेबी आणि तज्ज्ञ समितीच्या तपासावर उपस्थित करण्यात आलेले प्रश्न फेटाळून लावत निर्णय राखून ठेवला होता.

दरम्यान, आपल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञ समितीच्या सदस्यांनी उपस्थित केलेले प्रश्न फेटाळून लावले. हितसंबंधांच्या संघर्षाचा याचिकाकर्त्याचा युक्तिवाद निरर्थक असल्याचे म्हटले. ठोस कारणाशिवाय सेबीकडून तपास हस्तांतरित करण्याचा कोणताही आधार नसल्याचे न्यायालयाने म्हटले. मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे सेबीच्या तपासावर शंका करणे किंवा कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य नाही.

गेल्या वर्षाच्या सुरुवातीला २४ जानेवारी २०२३ रोजी अमेरिकन शॉर्ट सेलिंग कंपनी, हिंडेनबर्ग रिसर्चने उद्योगपती गौतम अदानींच्या सर्व कंपन्यांबाबत अहवाल प्रसिद्ध केला होता. ज्यात अनेक गंभीर आरोप केले. अदानी समूहाने अहवाल पूर्णपणे खोटा सांगत आरोप फेटाळून लावले. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर अदानी समूहाच्या सर्व शेअर्समध्ये मोठी पडझड झाली आणि त्यांच्या मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण पोहोचल्यावर वर्षभरात न्यायालयाने निकाल दिला आहे.

अदानींची पोस्ट चर्चेत

गौतम अदानी यांनी हिंडेनबर्ग खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे. अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांवर न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर काही मिनिटांत त्यांनी पोस्ट केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे, की सत्याचा विजय झाला आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून असे दिसून आले आहे की, सत्याचा विजय झाला आहे. सत्यमेव जयते. जे आमच्या पाठीशी उभे राहिले त्यांचा मी ऋणी आहे. भारताच्या विकासात आमचे योगदान कायम राहील, जय हिंद.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राजकारणात खळबळ!, शरद पवार-अजित पवार आज एकत्र येणार?

मुंबई । नगर सहयाद्री:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल...

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...

आजचे राशी भविष्य! ‘मे’ महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...