spot_img
देशनवीन फौजदारी कायदे 'या' तारखेपूर्वी लागू होणार! पहा..

नवीन फौजदारी कायदे ‘या’ तारखेपूर्वी लागू होणार! पहा..

spot_img

नवी दिल्ली-
नव्याने मंजूर केलेले फौजदारी कायदे लागू करण्याची अधिसूचना २६ जानेवारीपूर्वी जारी करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलिस अधिकारी, तपास यंत्रणा आणि न्यायवैद्यक संस्थांतील अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

ब्रिटिश काळापासून असलेले भारतीय न्यायसंहिता, फौजदारी दंडसंहिता आणि साक्षीदार कायद्यांऐवजी भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम असे तीन कायदे संसदेने मंजूर केले आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २५ डिसेंबरला या तिन्ही विधेयकांवर सह्या केल्या आहेत. या कायद्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हावी, वेगात व पुराव्यांवर आधारित तपास व्हावा, खटल्यांसाठीचा वेळ कमी व्हावा, यासाठी पोलिसांना प्रशिक्षण देण्याचा हेतू आहे.

या प्रशिक्षणासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांतील तीन हजार अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वर्षभरात ९० टक्के अपेक्षित अधिकारी-कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आहे, असेही अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. न्यायसंस्थेतील प्रशिक्षणासाठी केंद्रीय गृहमंत्रालय चर्चा करत असून, भोपाळ येथील अकादमीमध्ये हे प्रशिक्षण होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

द्राक्षाचा गोडवा वाढला! कीलोला किती रुपयांचा दर?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव,घारगाव ,कोळगाव, वडळी, आढळगाव, कोकणगाव, हिरडगाव, बेलवंडी कोठार,...

वेश्या व्यवसाय करणाऱ्या प्रियसीला संपवलं; रेड लाईट परिसरात प्रियकराच भयंकर कृत्य!

मुंबई । नगर सहयाद्री चारित्र्यावर संशय घेत प्रियकरानं वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या महिलेची हत्या...

रखरखत्या उन्हात पडणार रिमझिम धारा, हवामानात होणार बदल!

मुंबई । नगर । सहयाद्री:- देशभरात सध्या हवामानामध्ये सतत बदल होत असून, तापमानाचा अंदाज...

कोतवाली पोलिसांची कामगिरी; ५ वर्षांची हरवलेली चिमुकली ४० मिनिटात सापडली..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- १४ मार्च रोजी सकाळी दहा वाजता, केडगाव परिसरातील रोशन कुमार...