spot_img
महाराष्ट्रबीडमधील नेत्यांचे घर, कार्यालये पेटविण्याचा कट पूर्व नियोजित होता? धक्कादायक माहिती येतेय...

बीडमधील नेत्यांचे घर, कार्यालये पेटविण्याचा कट पूर्व नियोजित होता? धक्कादायक माहिती येतेय समोर

spot_img

बीड / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभर आंदोलने सुरु होती. याच दरम्यान बीड शहरातील आमदार, माजी मंत्र्यांचे घर पेटविण्याच्या घटनाही झाल्या. आता यातील आरोपींची धरपकड सुरु आहे. परंतु हे सर्व कट आधीच नियोजित असल्याचा संशय आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये पाटोदा तालुक्यातील अंमळनेर, बीड तालुक्यातील नाळवंडी व इतर गावांतील तरूणांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. तसेच ज्यांनी जाळपोळ केली ते लोक हातात पेट्रोल, डिझेलच्या बाटल्या घेऊन गर्दीत शिरत असल्याचेही व्हिडीओ फुटेज पोलिसांनी मिळविले आहेत. तसेच हे लोक कोडिंग लँग्वेज वापरत होते असेही तपासात समोर आले आहे.

माजलगावचे राष्ट्रवादीचे आ.प्रकाश सोळंके यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत काही लोकांनी त्यांच्या घरावर दगडफेक करत वाहने जाळली नंतर घरही पेटविले. हे लोण नंतर बीड शहरात आले. दुपारपर्यंत शांत असलेले बीड चार वाजल्यानंतर पेटण्यास सुरूवात झाली. सर्वांत आगोदर बीड शहरातील रस्त्यांवर टायर जाळण्यात आले.

त्यानंतर जमावातील एक गट बार्शी रोडवरील शरद पवार गटाच्या ताब्यात असलेल्या राष्ट्रवादी भवनाकडे गेला तेथे दगडफेक करून भवन जाळण्यात आले. तेथून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालय पेटविण्यात आले. एवढ्यावरही हा जमाव शांत राहिला नाही. रात्री सात वाजण्याच्या सुमारास हा जमाव माजी मंत्री शिवाजीराव पंडित, माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या घरांकडे गेला. तेथे त्यांनी दगडफेक करत बाहेर जाळपोळ केली. पोलिसांनी अश्रुधूरांचा वापर केल्याने जमाव पांगला. त्यानंतर जाळपोळीला ‘ब्रेक’ लागला.

९५ लोक ताब्यात
सोमवारी जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर संचारबंदी लागू झाली. मंगळवारी सकाळपासूनच संशयितांची धरपकड सुरु होती. बुधवारी दुपारपर्यंत ९५ लोकांना ताब्यात घेतले होते.

कोडवर्ड असल्याची चर्चा
जाळपोळ करणारे कोडवर्डमध्ये बोलत होते, अशी माहितीही समोर आली आहे. क्षीरसागरांचा बंगला पेटविल्यानंतर मस्के, खांडे यांची कार्यालये पेटविली. तेथून २२ नंबरला चला रे.. असे म्हणत जमाव माजी आ. अमरसिंह पंडित यांच्या घराकडे आला. हे सर्व लोक प्री प्लॅन करून आणि यादी घेऊनच जाळपोळ करत असल्याचा संशय आहे. हे सर्व कोडवर्डमध्ये बोलत होते, असेही सूत्रांनी सांगितले. पोलिस याचाही तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ३१ जानेवारीपर्यंत ‘हे’ काम करा; अन्यथा लाभ मिळणार नाही?

PM Kisan Yojana: केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी असलेली महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी...

अजबच! अहिल्यानगर जिल्ह्यात कुत्र्यावर गुन्हा दाखल?; नेमकं काय घडलं..

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- आहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चक्क कुत्र्यावर गुन्हा दाखल करण्यात...

‘नाजूक’ संबंधामुळे संसाराला ‘तडा’! प्रियकराच्या मदतीने पतीला संपवल..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मिरजगाव (ता. कर्जत) येथे 10 जानेवारी रोजी एका 35-40 वर्षे...

धक्कादायक! प्रियकराच्या घराबाहेर तृतीयपंथीयाची आत्महत्या

पुणे । नगर सहयाद्री:- पुण्यातील तृतीयपंथीयाला जयपूरचा तरूण आवडला. दोघांमधले प्रेम बहरले. ते दोघेही...