spot_img
अहमदनगरनिघोज पोलीसांच्या विरोधात उपोषणाचा इशारा? नेमकं प्रकरण काय, वाचा सविस्तर

निघोज पोलीसांच्या विरोधात उपोषणाचा इशारा? नेमकं प्रकरण काय, वाचा सविस्तर

spot_img

निघोज । नगर सह्याद्री
शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी फिर्याद देउनही आरोपीवर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यामुळे फिर्यादी यांनी निघोज पोलीसांच्या विरोधात उपोषणाचा इशारा दिला आहे.

अधिक माहिती अशी: वडनेर परिसरात फिर्यादी किसन जनार्दन वाजे यांची शेती आहे. शेतीच्या बांधावर त्यांच्या मालकीची झाडे आहेत. संभाजी शिवाजी थोरात, बाबाजी सखाराम थोरात, अरुण बाबाजी थोरात यांनी जेसीबीचे मालक गणेश रसाळ यांना बांधावरची झाडे काढण्यास सांगितले, ही माहिती मला मिळाल्यानंतर मी गणेश रसाळ यांना झाडे काढू नका असे सांगितले त्यानुसार रसाळ हे जेसीबी घेउन परत गेले.

या वरील थोरात बंधूंनी माझ्या घरी येऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत लाथा बुक्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी निघोज पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्याद दिल्यापासून तीन आठवड्या पर्यंत आरोपी विरुद्ध कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. याचा अर्थ पोलिस आणी आरोपी यांची मिलीभगत झाली आहे. याचा अर्थ मला न्याय मिळणार नाही. यापेक्षा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करुन मी न्याय मागत आहे.

उपोषनाच्या माध्यमातून मला न्याय मिळेल व आरोपी विरुद्ध पोलीस कारवाई करतील अशी अपेक्षा असून तीन दिवसाच्या आत आरोपी विरोधात कारवाई न झाल्यास निघोज पोलीसांच्या विरोधात जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा फिर्यादी किसन जनार्दन वाजे
यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...