spot_img
ब्रेकिंगसुप्यातील अतिक्रमणांवर हातोडा! पोलीस बंदोबस्तात कारवाई, कोणी केला विरोध? पहा..

सुप्यातील अतिक्रमणांवर हातोडा! पोलीस बंदोबस्तात कारवाई, कोणी केला विरोध? पहा..

spot_img

शरद रसाळ। सुपा
नगर पुणे रस्त्यावरील सुपा औद्योगिक परिसर व बस स्थानक परिसर तसेच सुपा पारनेर रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे टपऱ्या आस्थापनांची कार्यालये तसेच इतर अनधिकृत बांधकामांवर आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात हातोडा टाकण्यात आला. एमआयडीसीचे अधिकारी तसेच महसूल व पोलीस प्रशासन यांचे वरिष्ठ अधिकारी, अतिक्रमण विरोधी पथक आणि बांधकाम विभाग कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून हा अतिक्रमणाचा प्रश्न आणि त्याबाबत तक्रारी होत्या. रस्त्याच्या दुतर्फा झालेले अतिक्रमन आणि त्यामुळे वाहतुकीला होणारा अडथळा हा ही मोठा विषय होता. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने त्यावर कारवाई होत नव्हती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू असतानाच या अतिक्रमणावर हातोडा टाकण्यात आला.

कोणाचाही मुलाहिजा व विरोध न बाळगता पथकाने अतिक्रमणे काढण्यासाठी जेसीबी व अन्य यंत्रांचा वापर केला. काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली. या मोहिमेमुळे अतिक्रमण धारकांसह परिसरात मोठी धावपळ उडाली. सुपा बस स्थानकापासून ते पारनेर रोड पर्यंतची अतिक्रमणे काढण्याची कारवाई सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे.

सुपा पारनेर रोडवरील रस्त्यावर अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या आधीच सर्व अतिक्रमणधारकांना नोटीस दिल्या होत्या.

रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण काढावे यासाठी अतिक्रमण रेषा ही आखून दिली होती. तरीही अतिक्रमण काढले गेले नसल्याने आज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाच्या वतीने मोहीम राबवली गेल्याची माहिती नगर पारनेर तालुक्याचे प्रांताधिकारी गणेश राठोड यांनी दिली.

सर्व अतिक्रमण हटविणार
सकाळी सुपा पारनेर रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढण्यास आम्ही सुरूवात केली. हे अतिक्रमण औद्योगिक वसाहत चौकापर्यंत सुरू राहणार आहे. वेळ मिळाल्यास पुढे अतिक्रमण काढण्यात येईल. हे अतिक्रमण काढून पूर्ण झाल्यानंतर नगर- पुणे महामार्गावरील अतिक्रमण काढण्यात येईल.
-गणेश राठोड, प्रांताधिकारी.

सुपा-पारनेर रस्त्याने घेतला मोकळा श्वास
सुपा बसस्थानक चौक ते पारनेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. दुकाने रस्त्यावर थाटल्याने वाहतूकीचा नेहमी खोळंबा होत. बुधवारी बाजारच्या दिवशी वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली होती. याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता. तर चोर्‍यांचे प्रमाण वाढले होते. हे सर्व अतिक्रमण काढण्यात आल्याने सुपा – पारनेर रस्त्याने प्रथमच मोकळा श्वास घेतला. या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...