spot_img
ब्रेकिंगदहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली; 'या' तारखेला निकाल

दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेला निकाल

spot_img

पुणे / नगर सह्याद्री
Maharashtra Board 10th Result 2024 Date : बारावी पाठोपाठ आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आले आहे. मेच्या चाैथ्या आठवड्यात निकाल लागणार आहे. हेच नाही तर निकालाची तारीखही पुढे आलीये. 27 मे 2024 रोजी दहावीचा निकाल हा लागणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल लागणार आहे.

राज्यात दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान पार पडली. विशेष म्हणजे या परीक्षेची तयारी बोर्डाकडून जय्यत प्रकारे करण्यात आली. यंदा 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलीये. आता विद्यार्थ्यांनी निकालाची प्रतिक्षा संपली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आता निकालाची तारीख जाहीर करण्यात आलीये. दहावीच्या निकालाचे जवळपास सर्वच काम पूर्ण झाल्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलंय. दहावीचे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.

mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या साईटवर जाऊन विद्यार्थी दहावीचा निकाल पाहू शकतात. अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल, त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेल. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारलीये. आता दहावीच्या निकालात कोण बाजी मारते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...