जालना। नगर सह्याद्री-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठा समाजासह मला संपवण्याचा डाव आहे. सलाईनमधून विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप करत ‘चार’ प्रमुख करणे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितली आहे.
देवेंद्र फडणवीसचे पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे. त्यांच्यामुळे अनेकांनी भाजप सोडले. सलाईनमधून विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव होता. मी सागर बंगल्यावर येतो, जर मी रस्त्यात मेलो तर मला त्याच्या दारात नेऊन टाका असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
जरांगे पाटील यांनी सांगितली चार करणे
उपोषण सोडण्याच्या वेळी येउ न दिल्याचा राग
केंद्रीय मंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे रद्द झाल्याचा राग
माफी मागावी लागल्याचा राग
मराठ्यांना एकत्र करणारा मोठा नेता असल्याचा राग