spot_img
ब्रेकिंगआंतरवाली सराटीतील गोंधळ! जरांगे पाटील आक्रमक; निघाले 'सागर' बंगल्यावर?

आंतरवाली सराटीतील गोंधळ! जरांगे पाटील आक्रमक; निघाले ‘सागर’ बंगल्यावर?

spot_img

जालना। नगर सह्याद्री-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठा समाजासह मला संपवण्याचा डाव आहे. सलाईनमधून विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप करत सागर बंगल्यावर निघाल्याने आंतरवाली सराटीतील आंदोलनस्थळी एकच गोंधळ उडाला आहे.

देवेंद्र फडणवीसचे पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे. त्यांच्यामुळे अनेकांनी भाजप सोडले. राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाहीतर देवेंद्र फडणवीस चालवत आहे. अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे रद्द झाल्याने फडणवीसांचा आपल्यावर राग आहे. सलाईनमधून विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव होता.

देवेंद्र फडणवीस तुम्ही माझा बळी घ्या, पण खोटे आरोप सहन करणार नाही, तुम्हाला कायमचा आयुष्यातून उठवेन, माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, मी आता सागर बंगल्यावर येतो, जर मी रस्त्यात मेलो तर मला त्याच्या दारात नेऊन टाका असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे सागर बंगल्याच्या दिशेने: आंतरवाली सराटीतील गोंधळ
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्या, हा मुद्दा लावून धरला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याचदरम्यान, मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत सागर बंगल्यावर निघाल्याने आंतरवाली सराटीतील आंदोलनस्थळी एकच गोंधळ उडाला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....