spot_img
ब्रेकिंगपावसाची प्रतिक्षा लांबणीवर!

पावसाची प्रतिक्षा लांबणीवर!

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
आता संपूर्ण देशाला मान्सूनची प्रतिक्षा लागली आहे. मान्सूनने केरळमध्ये धडक दिल्याने तो लागलीच महाराष्ट्रात सरींचा सांगावा घेऊन येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. उकाड्यापासून एकदाची सूटका होईल असा अंदाज होता. पण मुंबईकरांच्या आनंदावर विरजण पडले आहे. मुंबईकरांची पावसाची प्रतिक्षा लांबणीवर पडली आहे. मुंबईत मान्सून जूनच्या दुसर्‍या आठवड्यात दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेची शयता असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्ण वातावरणाची शयता वर्तवली आहे. पावसाळा जवळ येत असल्याने मुंबई हवेतील आर्द्रता वाढली आहे. घामाचा धारा लागल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

पाणी जास्त प्या, टोपी घाला , उन्हाच्या कडायात फार फिरु राहू नका असा सल्ला डॉटरांनी दिला आहे. मुंबईकरांची पावसाची प्रतिक्षा लांबणीवर पडली आहे. मुंबईत मान्सून जूनच्या दुसर्‍या आठवड्यात दाखल होणार आहे. आजचा दिवसही डोयाला ताप वाढवणारा असेल. तापमान ३६ अंशापर्यंत राहील तर आर्द्रताही ६० टक्क्यांहून जास्त असेल, असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला, बूधवारपर्यंत उष्ण आणि दमट वातावरणाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ट्रॅक्टरच्या टायरमध्ये का भरलं जात पाणी? अनेकांना पडलेला महत्वाचा प्रश्न, वाचा त्यामागचं कारण

मुंबई । नगर सहयाद्री:- आपण इतर वाहनांच्या टायरमध्ये हवा भरतो, पण ट्रॅक्टरच्या टायरमध्ये हवेऐवजी...

बाप रे! बर्फाच्या कारखान्यात धक्कादायक प्रकार; कामगाराच्या डोक्यात ‘इतके’ टाके

जामखेड । नगर सहयाद्री:- जामखेड येथे बर्फ कारखान्यात गेल्या आठ वर्षापासून कामाला असलेल्या परप्रांतीय...

मेहुणीला करायचं होतं भाऊजीला खूश, पुढे घडलं असं काही….

Crime News : सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्यासाठी काही लोक कोणत्याही स्तरावर जाऊन...

अजबच! ‘सिबिल स्कोअर’ खराब असल्याने मोडलं लग्न..

Maharashtra News: सामान्य ग्राहकाला कर्ज देताना बँका त्या ग्राहकाच्या परतफेडीच्या क्षमतेसोबतच त्याच्या ‘सिबिल स्कोअर’चासुद्धा...