spot_img
अहमदनगरAhmednagar Crime: धक्कादायक! केसेस करता म्हणून दिव्यांगाला औषध पाजून मारण्याचा प्रयत्न

Ahmednagar Crime: धक्कादायक! केसेस करता म्हणून दिव्यांगाला औषध पाजून मारण्याचा प्रयत्न

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
केसेस करतो म्हणून दिव्यांग व्यक्तीला विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पत्नीला मारहाण करण्यात आल्याची घटना नगर तालुयातील वाळकी शिवारात घडली. खंडु सिताराम भालसिंग (वय ५० रा. वाळकी) असे जखमी दिव्यांग व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी उपचार घेतल्यानंतर नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दिलेल्या फिर्यादीवरून शंकर सिताराम भालसिंग, नितीन शंकर भालसिंग, मिना शंकर भालसिंग (सर्व रा. वाळकी ता. नगर) यांच्याविरूध्द पोलिसांनी खूनाचा प्रयत्न, मारहाण, शिवीगाळ, अपंग अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. १९ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता फिर्यादी त्यांच्या घरी असताना शंकर भालसिंग याच्यासह तिघे तेथे आले.

फिर्यादी पोर्चमध्ये होते व त्यांच्या पत्नी घरातील किचनमध्ये होत्या. शंकर फिर्यादीला म्हणाला, तु आमच्यावर केसेस करतो का, तुला दुपारी कमी मारले, आता जिवच मारून टाकतो, असे म्हणून त्याने विषारी औषधाची बाटली काढली. शंकर व नितीन यांनी फिर्यादीला धरून त्यांच्या तोंडात विषारी औषधाची बाटली होतून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीची पत्नी सुनीता यांना मिना भालसिंग हिने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व घरातील किचनमध्येच दाबून धरले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान विषारी औषध पाजल्याने फिर्यादीवर रूग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांनी उपचार घेतल्यानंतर गुरूवारी (दि. २३) सायंकाळी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...