spot_img
ब्रेकिंग"आम्ही जवळ असल्याने उलट्या..." ; एका वक्तव्यावरुन महायुतीत 'मिठाचा खडा'

“आम्ही जवळ असल्याने उलट्या…” ; एका वक्तव्यावरुन महायुतीत ‘मिठाचा खडा’

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावरुन महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. ज्यांना आम्ही जवळ असल्याने उलट्या होतात, अशा ठिकाणी आम्ही थांबणं जनतेला आवडणार नाही, सत्ता गेली चुलीत अशा पद्धतीच्या भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्त उमेश पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी बाबतीत केलेल्या विधानामुळे मोठी खळबळ माजली आहे.

राष्ट्रवादीसोबत आपले कधीच पटले नाही. कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात. असे विधान तानाजी सावंत यांनी केलं. तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी बद्दल त्यांची नाराजी उघडपणे दिसून येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्त उमेश पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तानाजी सावंतांनी असं बोलणं म्हणजे आम्ही सत्तेसाठी लाचार झालो आहोत, असं लोक म्हणतील.

ज्यांना आम्ही जवळ असल्याने उलट्या होतात, अशा ठिकाणी आम्ही थांबणं कार्यकर्त्यांना, महाराष्ट्रातील जनतेला आवडणार नाही. महाराष्ट्राची, मराठी मनाची एक अस्मिता आहे. अशा वक्तव्यामुळे उद्या राजकारण्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. लोकांना वाटेल राजकारणी लोक काय बोलतात, इतके घाणेरडे लोक असतील, तर राजकारण आणि सत्ता गेली चुलीत” असं उमेश पाटील म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील साई कॉलनी परिसरात साक्षीदाराला पत्राद्वारे धमकी दिल्याचा प्रकार घडला....

पुण्यात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार; आयुषच्या हत्येची धक्कादायक माहिती उजेडात

पुणे / नगर सह्याद्री - पुणे शहरातील नाना पेठ परिसरामध्ये झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील...

शहरात साहित्योत्सव रंगणार; संमेलनाची तयारी पूर्ण, ११, १२ सप्टेंबरला भरगच्च कार्यक्रम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य...

शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही!; मंत्री विखे पाटील

मंत्री छगन भुजबळ यांची मागणी फेटाळली मुंबई । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने...