spot_img
मनोरंजनवाढदिवसाच्या दिवशी विराट शतक ः अनुष्का शर्माचा आनंद गगनात मावेना

वाढदिवसाच्या दिवशी विराट शतक ः अनुष्का शर्माचा आनंद गगनात मावेना

spot_img

मुंबई ः विराट कोहलीने आपल्या ३५व्या वाढदिवसाच्या दिवशी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकीर्दीतील ४९वं शतक ठोकलं आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेतील ३७व्या सामन्यात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात विराटने ४९वं शतक झळकावत सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबर केली.

विराटने हे शतक ११९ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने पूर्ण केलं आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र विराटचं कौतुक केलं जात आहे. पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्माने या आनंदाच्या भरात इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे; जी चांगलीच व्हायरल झाली आहे. काही तासांपूर्वी अनुष्काने विराटच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली होती.

तिने इन्स्टाग्रामवर तीन फोटो शेअर करत लिहीलं होतं की, विराट प्रत्येक भूमिकेत सर्वात आघाडीवर राहिला आहे, तरीही तो कोणते ना कोणते यश मिळवत राहतो. मी तुझ्यावर कायम असेच प्रेम करीन, प्रत्येक क्षणी, काहीही झाले तरी.’ अनुष्काच्या या खास पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. आता तिने विराटने ४९वं शतक ठोकल्यावर इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माने विराटचं ४९वं शतक पूर्ण झाल्यानंतरच्या त्या क्षणाचा एक फोटो शेअर केला आहे.

ज्यावर लिहीलं आहे की, स्वतःच्या वाढदिवसाला स्वतःच गिफ्ट दिलं. अनुष्काची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. दरम्यान, विराट कोहली पूर्वी अनेक क्रिकेटरने वाढदिवसाच्या दिवशी वनडे शतक झळकावले होते. टॉम लॅथम, रॉस टेलर, सनथ जयसूर्या, मिचेल मार्श, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांनी वाढदिवशी शतक ठोकलं होतं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अभिनेत्री कंगनाची पोस्ट चर्चेत, महिलांना पुरुषांची गरज पण…

मुंबई। नगर सहयाद्री अभिनेत्री कंगना रनौत कायम चर्चेत असते. आता देखील तिने एक पोस्ट शेअर...

काका अजित पवारांचा पुतण्या रोहित पवारांवर मोठा राजकीय वार ! घणाघाती टीका

कर्जत / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत सरकारमध्ये...

सोने खरेदी करताना बिलाचे महत्व काय? खरे बिल कसे असावे? जाणून घ्या

नगर सह्याद्री टीम : सोन्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. गुंतवणुकीसाठी अनेक लोक सोने खरेदी...

शेतकऱ्यांना मालामाल करेल ‘ही’ वनस्पती, शेकडो महिलांनी कमवलेत लाखो रुपये

नगर सह्याद्री टीम : Lemongrass Farming : प्रत्येकाला कमी खर्चात चांगला नफा मिळवायचा असतो आणि...