spot_img
अहमदनगरमोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी कामाला लागा, 'या' नेत्याने का केले असे वक्तव्य...

मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी कामाला लागा, ‘या’ नेत्याने का केले असे वक्तव्य…

spot_img

आगामी निवडणुकांसाठी प्रमुख पदाधिकारी, सुपर वॉरिअर यांची बैठक
अहमदनगर | नगर सह्याद्री –
गेल्या १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने मोठी प्रगती केली आहे. जागतिक पातळीवर भारताचा वाढत असलेला प्रभाव हे पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या दूरदृष्टीचे द्योतक आहे. अशीच घोडदौड राज्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नियोजनाखाली सुरु आहे. येणार्‍या सर्वच निवडणुकीत भाजपाला नंबर एकचा पक्ष करण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे,  नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी कामाला लागा असे आवाहन भाजपाचे नगर शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केले.

प्रभाग क्रमांक १ व २ मधील प्रमुख पदाधिकारी, सुपर वॉरिअर यांची बैठक शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, लोकसभा निवडणूक प्रमुख माजी महापौर बाबासाहेब वाकळे, विधानसभा प्रमुख  भैय्या गंधे यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी सरचिटणीस सचिन पारखी, सावेडी मंडल अध्यक्ष  नितीन शेलार, विधानसभा विस्तारक सागर भोपे, उपाध्यक्ष बाबासाहेब सानप, नगरसेवक रामदास आंधळे, चिटणीस महेश तवले आदी उपस्थित होते.

यावेळी आगरकर म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या केंद्र व राज्यातील सरकारने सर्वसामान्यांसह सर्वच क्षेत्रातील लोकांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकास साधला आहे. या योजनांचा लाभ अनेकांना होत असल्याने अनेक लोक भाजपाशी जोडले जात आहेत. येणार्‍या निवडणुकीत पुन्हा नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागावे असे ते म्हणाले.

याप्रसंगी बाबासाहेब वाकळे म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ संबंधितापर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे.  ज्यांनी या योजनेंतून प्रगती साधली अशा लोकांचा प्रतिक्रिया जनसामान्यापर्यंत पोहचवाव्यात. नगर लोकसभा मतदार संघातील भाजपाचे खा.डॉ.सुजय विखे यांनी नगरमध्ये केलेल्या विकास कामांमुळे नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जनतेच्या संपर्कात रहावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पारखी यांनी केले तर आभार नितीन शेलार यांनी मानले. यावेळी प्रभाग १ व २ मधील भाजपाचे पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अभिनेत्री कंगनाची पोस्ट चर्चेत, महिलांना पुरुषांची गरज पण…

मुंबई। नगर सहयाद्री अभिनेत्री कंगना रनौत कायम चर्चेत असते. आता देखील तिने एक पोस्ट शेअर...

काका अजित पवारांचा पुतण्या रोहित पवारांवर मोठा राजकीय वार ! घणाघाती टीका

कर्जत / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत सरकारमध्ये...

सोने खरेदी करताना बिलाचे महत्व काय? खरे बिल कसे असावे? जाणून घ्या

नगर सह्याद्री टीम : सोन्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. गुंतवणुकीसाठी अनेक लोक सोने खरेदी...

शेतकऱ्यांना मालामाल करेल ‘ही’ वनस्पती, शेकडो महिलांनी कमवलेत लाखो रुपये

नगर सह्याद्री टीम : Lemongrass Farming : प्रत्येकाला कमी खर्चात चांगला नफा मिळवायचा असतो आणि...