spot_img
अहमदनगरविजयराव औटींनी सांगितले विखेंना पाठिंबा देण्याचे कारण...

विजयराव औटींनी सांगितले विखेंना पाठिंबा देण्याचे कारण…

spot_img

माझी जनता सुरक्षित राहील हे मी पाहिले | खा. विखेंच्या पाठिंब्यासाठी औटी समर्थकांचा मेळावा
पारनेर / नगर सह्याद्री –
राजकारण करत असतांना लोकांना समोर ठेवून महाविकास आघाडी सोबत जायचे की कुठे जायचे याची चर्चा केली. माझी जनता कोणाच्या हातात सुरक्षित राहिल हे मी पाहिले. तिसर्‍यांदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होणार आहेत. देश कोणाच्या हाता सुरक्षित राहिले हे पाहिले. देशाचे कृषीमंत्री असतांना हमीभावाचा कायदा का नाही करता आला असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार यांना करत खासदार सुजय विखे पाटील यांनी मतदारसंघात चांगले काम केले आहे. अजून त्यांना संधी मिळाल्यास मतदसंघात त्याचा फायदा होईल यासाठी महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा दिला असल्याचे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी स्पष्ट केले.

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष, माजी आमदार विजय औटी यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर पाठिंब्याविषयी सविस्तर भुमिका मांडण्यासाठी पारनेर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी रोखठोक भूमिका मांडली.

यावेळी व्यासपिठावर उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, माजी सभापती गणेश शेळके, माजी पंचायत समिती सदस्य शंकर नगरे, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, माजी सरपंच सुरेश बोर्‍हुडे, माजी नगराध्यक्ष विजय औटी, नगरसेवक युवराज पठारे, नगरसेवक नवनाथ सोबले, माजी सरपंच साहेबराव वाफारे, शिवसेना शहर प्रमुख निलेश खोडदे, माजी पंचायत समिती सदस्य पोपट चौधरी, कांतीलाल ठाणगे, सतिष म्हस्के आदींसह औटी समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी आमदार औटी म्हणाले, राजकारण करत असताना लोकांना समोर ठेवुन निर्णय घेतला. महाविकास आघाडी सोबत जायचे की कुठे यावर चर्चा केली. माझी जनता कोणाच्या हातात सुरक्षित आहे हे मी पाहीले. कोणालाही फोन केले नाही फक्त सोशल मिडीयावर व वर्तमान पत्रातुन आवाहन केले.

राज्यातील जल युक्त शिवार योजनेअंतर्गत, रस्ते निधी विविध योजनेतुन विरोधी पक्षात असताना कामे मार्गी लावली. लोकशाहीमध्ये सर्वांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. देशाचे नेते नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. देश कोणाच्या हातात सुरक्षित आहे ते पाहिले. देशाचे कृषीमंत्री असताना हमीभावाचा कायदा का नाही करता आला असा सवाल औटी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केला.
कांद्याबाबत ठोस धोरण असायला हवे. कांदा साठवणूक करणे आवश्यक आहे. कांद्याला शाश्वत भाव मिळणे आवश्यक आहे. पाझर तलाव पाईपलाईन द्वारे भरुन देणार असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. ते त्यांच्याकडुन मी वदवून घेणार आहे.

पदावर काम करताना काही योजना समजुन घ्याव्या लागतात. खासदार सुजय विखे यांचा पाच वर्षांचा अनुभव लक्षात घेता त्यांनी चांगले काम केले. त्यांना अजुन संधी मिळाल्यास मतदारसंघात त्याचा फायदा होईल. पक्षाने चुकीची भुमिका घेतली ती मी का स्वीकारावी. माझी भुमिका लोकाभिमुख आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर बोलायला पाहिजे. देशाच्या लोकशाहीवर बोलणारा उमेदवार हवा असे औटी म्हणाले. तसेच त्यांनी खा. सुजय विखे पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
भलेही राजकारणात हार जीत झाली. मात्र आम्ही प्रामाणिकपणा कधी सोडला नाही नगरपंचायत, बाजार समिती सह एकही निवडणूक एकहाती केली नाही. कायम कोणाची तरी साथ घेतली. खरेदी विक्री संघात औटी यांनी शांत बसुन घेतले. त्या निवडणुकीत लंके यांना हार पत्करावी लागली. औटी यांनी केलेल्या विकासकामांमुळे त्यांचे नाव आजही गावोगावी काढले जाते. दहशत मोडण्यासाठी औटी यांनी घेतलेली भुमिका योग्य असल्याचे मत भाजपा पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील यांनी व्यक्त केले.

आमच्यासमोर सामान्य माणसाचे भुत उभे केले होते. जे झाले ते झाले आता सर्व एकत्र येऊन समोरच्या उमेदवाराचा खोटेपणाचा बुरखा फाडणार आहोत असे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी सांगितले.
माजी सरपंच सुरेश बोरुडे म्हणाले, मी औटी साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. त्यांचा आदेश आमच्यासाठी सर्वस्व आहे. लोकसभा निवडणुकीत नारायणगव्हाण परीसरातुन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांना मताधिय देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निलेश खोडदे म्हणाले, माजी आमदार विजय औटी यांनी ज्यांना राजकारण शिकविले. मातोश्रीचा रस्ता दाखविला, विविध राजकीय पदावर त्यांना संधी दिली त्यांनी माजी आमदार विजय औटी यांच्याशी फारकत घेतली आहे. येणा-या काळात त्यांना याची किंमत नक्की मोजावी लागेल अशी टीका निलेश खोडदे यांनी डॉ. श्रीकांत पठारे यांच्यावर केली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांनी पाठिंब्याविषयी सविस्तर भूमिका मांडली. दरम्यान सर्वच नेत्यांनी खासदार सुजय विखे पाटील यांना मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...