spot_img
अहमदनगरपोलिस वाहनाच्या धडकेत दोघे जखमी; संतप्त जमावाकडून गाडीची तोडफोड

पोलिस वाहनाच्या धडकेत दोघे जखमी; संतप्त जमावाकडून गाडीची तोडफोड

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री

दिल्लीगेट वेशीजवळ मंगळवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या एका स्कॉर्पिओने दुचाकी वरील दोघांना जोराची धडक दिली. यात दोघेही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान घटनेनंतर संतप्त नागरिकांनी एकत्र येऊन पोलिसांची स्कॉर्पिओ अडवून धरली. जमाव आक्रमक झाल्यानंतर गाडीची तोडफोड करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

शहरात पंतप्रधानांच्या सभेसाठी बंदोबस्ताला जिल्हाभरातून पोलिस अधिकारी कर्मचारी दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात बाहेरून वाहने नगर शहरात आलेली आहेत. रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांची एक स्कॉर्पिओ (एमएच ४३ जी २७०) सिद्धीबागेकडून दिल्लीगेटच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना समोरून येणार्‍या दुचाकीला (एमएच १७ झेड ४३८३) त्यांनी जोराची धडक दिली. या दुचाकीवरील दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत.

स्थानिक नागरिकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. मोठा जमाव जमल्याने त्यांनी पोलिसांची स्कॉर्पिओ अडवून धरली. जमाव आक्रमक झाल्याने गाडीची तोडफोडही करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कोतवाली व तोफखाना पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...