spot_img
अहमदनगर"वाहनांची तोडफोड तर काही नागरीकांना इजा" आता 'हा' त्रास तातडीने थांबवा अन्यथा...;...

“वाहनांची तोडफोड तर काही नागरीकांना इजा” आता ‘हा’ त्रास तातडीने थांबवा अन्यथा…; विवेक कोल्हे यांनी दिला इशारा, नेमकं प्रकरण काय?

spot_img

कोपरगाव । नगर सहयाद्री:-
शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे. ऐन गणेश उत्सवाच्या काळात खरेदीसाठी आलेल्या नागरीकांना जीव मुठीत घेऊन खरेदी करावी लागते आहे. गणेश चतुर्थीनिमित्त शहरात गणेश मूर्ती आणि साहित्य खरेदीसाठीआलेल्या नागरीकांना काही मोकाट जनावरांच्या झुंजी वर्दळीच्या ठिकाणी सुरू असल्याने अनेक काळ त्रास सहन करावा लागला आहे. काही नागरीकांना इजा होऊन वाहनांची तोडफोड झाली असल्याची बाब घडल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप होतो आहे. या मोकाट जनावरांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी जनतेत तीव्र भावना उमटत आहे. त्याची दखल घ्यावी व कार्यवाही करावी, अशी प्रतिक्रिया सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली आहे.

कायदा सुव्यववस्था आणि नागरिक सुविधा यांच्या बाबतीत हलगर्जीपणा झाला तर जनतेला त्याचे तोटे सहन करावे लागतात. शहरातअसे विविध समस्यांचे ढीग साचले आहे. मोकाट जनावरे सकाळी मुख्य रस्ते अडवून ठेवतात तर जवळ जाणाऱ्या नागरीकांना जीवाचा धोका यामुळे निर्माण होतो. जंगली हिंस्र प्राण्यांप्रमाणे नागरिकांनी या प्रकाराचा धसका घेतला आहे. लहान मुले, महिला मोठ्या संख्येने खरेदीसाठी या काळात घराबाहेर पडत असतात. रस्त्यांची दुरावस्थेतून प्रवास करत असताना खड्डे हुकवावे की मोकाट जनावरे मध्यरस्त्यात असताना त्यांच्या धक्क्यापासून संरक्षण करायचे यात अनेकांची धांदल उडते. सण प्रशासन घटकांनी उत्सवाच्या आणि अशा काळात जबाबदार प्रकारच्या हलगर्जीपणामुळे नागरीकांना त्रास होऊ शकतो याचे भान

ठेवून वेळीच पावले उचलली पाहिजे होती. नागरिक सुरक्षित नसतील तर बाजारपेठेवर त्याचे परिणाम होतात. जिवितला हानी होऊ नये म्हणून पर्यायाने लोक ऑनलाईन खरेदीचा पर्याय स्वीकारतात हे मूळ कारण आहे. रस्ते आणि मोकाट जनावरांच्या वावराने नागरी सुरक्षा याचा बोजवारा उडाल्याने प्रत्यक्ष खरेदी ऐवजी ऑनलाईन मार्ग लोक निवडू लागतात याचा तोटा शहराला होतो आहे. याचे देखील भान प्रशासनाने ठेवले पाहिजे. तातडीने यावर कार्यवाही करून उत्सव काळात या प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी पावले उचलावी अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करावे लागेल, असा इशारा कोल्हे यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...