spot_img
ब्रेकिंगतरुणांसाठी खुशखबर! शिंदे सरकारची मोठी घोषणा; ५०,००० जागांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

तरुणांसाठी खुशखबर! शिंदे सरकारची मोठी घोषणा; ५०,००० जागांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्र शासनाने बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी भरती योजना जाहीर केली आहे. राज्यभरातील गावांमध्ये योजनादूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या अंतर्गत ५०,००० पदांवर भरती केली जाईल. योजनादूत म्हणून निवडलेल्या व्यक्तींना दरमहा १०,००० रुपये मानधन दिले जाईल. नियुक्तीचा कालावधी ६ महिने असेल आणि यानंतर त्यांना शासनाकडून प्रमाणपत्रही प्राप्त होईल.

योजनादूत म्हणजे काय?

योजनादूत हे एक महत्त्वाचे पद असून, यासाठी निवडलेले उमेदवार राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणार आहेत. त्यांनी लोकांना योजना वापरण्याच्या पद्धती आणि योजनेचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.

आवश्यक कागदपत्रे
१. आधार कार्ड
२. रहिवासी दाखला
३. पदवी प्रमाणपत्र
४. संगणक प्रमाणपत्र (MSCIT)

अर्ज कसा करावा?
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी mahayojanadoot.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागेल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख
योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ सप्टेंबर २०२४ आहे.
अधिक माहिती आणि अर्जासाठी संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेला ‘ब्रेक’ घेतलेले नितीन दिनकर विधानसभेला विजयाचा ‘गिअर’ टाकणार

काँग्रेसचा बालेकिल्लाला भाजप सुरुंग लावणार श्रीरामपूर | नगर सहयाद्री:- राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही...

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला बाळासाहेब खिलारी गटाने फटाके फोडत केला आनंद साजरा पारनेर/प्रतिनिधी...

आता ‘ही’ माझी शेवटची निवडणूक; माजी मंत्री शिवाजी कर्डिले स्पष्ट्च बोलले..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लवकर शेतकऱ्यांना दुधाच्या जोडधंद्यासाठी...