spot_img
अहमदनगरAhmednagar:जिल्हा परिषदेत तोडफोड!! अधिकारी-कर्मचार्‍यांनी घेतली 'मोठी' भुमिका

Ahmednagar:जिल्हा परिषदेत तोडफोड!! अधिकारी-कर्मचार्‍यांनी घेतली ‘मोठी’ भुमिका

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
गुरुवार दि. १८ जानेवारी २०२४ रोजी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयाची तोड-फोड काही समाजकंटकानी केली. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अधिकारी- कर्मचारी हे प्रचंड दहशतीत आहेत. महिला कर्मचा-यांची छेड काढणे, अधिकारी, कर्मचारी यांचेशी असभ्यल वर्तण करणे अशा घटना यापुर्वीही घडल्या आहेत. यापुढे समाजकंटकांवर वचक बसावा यासाठी अधिकारी-कर्मचार्‍यांनी जिल्हा परिषद गेटसमोर एक तास कामबंद आंदोलन केले.

ग्रामीण भागाच्या विकासामध्ये जिल्हात परिषदेचा मोलाचा वाटा आहे. या कारणाने जिल्हात परिषदेत अभ्यंगतांचा वावर हा इतर शासकिय कार्यालयापेक्षा जास्त आहे. गुरुवारी घडलेल्या तोडफोडीच्या घटनेमुळे जिल्हा परिषदेत अधिकारी / कर्मचारी सुरक्षित नाहीत हे अधोरेखित झाले आहे. भविष्यात आशा घटना होणार नाही अथवा समाजकंटकांना वचक बसावा आणि जिल्हा् परिषद अधिकारी, कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टिने जिल्हा परिषदेत पुर्ण वेळेसाठी २ बंदुकधारी पोलीस आणि सिंगल डोअर एुन्ट्री असावी अशी सर्व अधिकारी कर्मचारी यांची मागणी आहे. यासाठी अधिकारी कर्मचारी संघटनांनी १ तासाचे काम बंद आंदोलन करून निवेदन दिले. काम बंद आंदोलनात सर्वच विभागप्रमुखांसह कर्मचा-यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कामबंद आंदोलन हे जिल्हा परिषद मुख्यायलयासह सर्वच पंचायत समित्यांमध्येही करण्यात आले.

या आंदालनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) राहुल शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, शैलेश मोरे, मनोज ससे, प्रकल्प संचालक समर्थ शेवाळे, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, शिवाजी राऊत, किरण साळवे, सुभाष कराळे, विकास साळुंके, अभय गट, महेंद्र आंधळे, यशवंत सालके, सागर आगरकर, चंद्रकांत वाकचौरे, के. के. जाधव, प्रमोद साळवे, खलील शेख, प्रमोद राऊत, कल्पना शिंदे, प्रशांत मोरे, आदिनाथ मोरे, अनघा कुलकर्णी, बाळासाहेब सोनावळे, सोमनाथ मिटे, संतोष लंके, शशिकांत रासकर, मनोज चोभे, विलास वाघ, संदिप वाघमारे, अंबादास जमदाडे, योगिराज वारुळे, सुमित चव्हाण, अमोल गोसावी, नाना हांबर्डे, माऊली बोरुडे, विजय कोरडे, रजनी जाधव, स्मिता उंडे, विजया गायकवाड, शेपाळ मॅडम, इम्रान शेख, भाऊ कु-हे, रोहित रणशुर, सुहास गोबरे, सचिन वाघ, सचिन कोतकर, अनिल धाडगे, हेमंत कुलकर्णी, पुनम उदावंत, वैशाली कासार आदींसह सर्वच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शिवसेना खंबीरपणे गोरक्षकांच्या पाठीशी: काळे

माजी मंत्री अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त सावेडीतील सतनाम साक्षी गोशाळेत चारावाटप अहिल्यानगर । नगर...

औरंगजेबाची कबर हटवा; बजरंग दल मैदानात!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- वर्तमान राज्य सरकार व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर...

..म्हणुन बीडमधील परिस्थिती खराब; शरद पवार यांनी साधला धनंजय मुंंडेंवर निशाणा!

Politics News: बीडमधील सध्याची परिस्थिती आणि तेथील वाढत्या गुन्हेगारीवरून शरद पवार यांनी तेथील राजकारण्यांवर...

धक्कादायक! विवाहितेवर अत्याचार करत ‘तसले’ व्हिडीओ पतीला पाठविले

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर शहरातून एक मानवतेला काळिमा फसवणारी घटना उघडकीस आली आहे....