spot_img
अहमदनगर'शेवटच्या श्वासापर्यंत..';शिवजन्मोत्सव सोहळ्यात डॉ. विखे पाटील काय म्हणाले? वाचा..

‘शेवटच्या श्वासापर्यंत..’;शिवजन्मोत्सव सोहळ्यात डॉ. विखे पाटील काय म्हणाले? वाचा..

spot_img

शिर्डी | नगर सह्याद्री:-
शिर्डी मध्ये नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेत निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागावे. शिडतील माता-भगिनी सुरक्षित राहाव्यात आणि समृद्ध शिड घडवण्यासाठी विखे पाटील परिवार सातत्याने प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी छत्रपती शासनाच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात केले.

यावेळी छत्रपती शासनाच्या वतीने घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांना सात लाख रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. तसेच शिडतील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या 300 कुटुंबांना घरगुती आवश्यक वस्तूंचे वाटपही करण्यात आले. विखे पाटील परिवाराच्या वतीनेही तिन्ही कुटुंबांना सात लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.शिडत शांतता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी यावेळी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामस्थांनी एकमुखाने अनिष्ट प्रवृत्तींचा विरोध करण्याचा आणि समाजहिताचे निर्णय घेण्यासाठी एकोप्याने राहण्याचा निर्धार केला.

याबद्दल डॉ. सुजय विखे पाटील यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. शिडच्या विकासासाठी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून शिड बस स्थानकाच्या समोर शिवसृष्टी उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. तसेच शिड सुरक्षित राहावी आणि चुकीची कृत्ये करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.साईबाबा संस्थानच्या टोकन प्रणालीबद्दल समाधान व्यक्त करताना त्यांनी यामुळे मंदिर परिसरात दररोज 10,000 लोकांची गद कमी झाल्याचे सांगितले. मात्र, हे 10,000 लोक कोण होते? याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

शिर्डीच्या सुरक्षिततेसाठी आणि भक्तांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. कोणीही अन्यायग्रस्त झाल्यास विखे पाटील परिवार त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहील. समाजहितासाठी सत्य बोलायचे असेल, तर त्यासाठी कोणताही विरोध पत्करण्यास आम्ही तयार आहोत, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी शिडत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याची घोषणा करण्यात आली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीगोंद्यात गुन्हेगारीचा कहर! महिलेच्या डोक्याला लावली पिस्तुल, पुढे घडलं असं काही..

श्रीगोंदा | नगर सह्याद्री तालुक्यातील वडाची वाडी येथे कोर्टातील दाव्याच्या कारणावरून एका महिलेस पिस्तुलाचा...

नगरमध्ये चाललंय काय? दोन दिवसात ‘इतक्या’ अल्पवयीन मुला-मुलीचे अपहरण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दोन दिवसांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अल्पवयीन मुलीसह मुलाचे अपहरण केल्याच्या...

गोदावरीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, पहा कुठे काय परस्थिती?

नाशिक । नगर सहयाद्री :- नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अवसायानात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांची प्रतिक्षा अखेर संपली असून...