मुंबई । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट मुंबईतील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतिर्थ’ येथे पार पडली. गणेशोत्सवानंतरची ही दुसरी भेट असून, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ती विशेष महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे नेते अनिल परब आणि संजय राऊत यांनीही या भेटीत सहभाग घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार, ही भेट कौटुंबिक स्वरूपाची नसून पूर्णपणे राजकीय आहे. महापालिका निवडणुकीपूव उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यतेने शिंदे गटाच्या शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. या भेटीला वाटाघाटीची पहिली बैठक मानलं जात आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात होण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवानंतर उद्धव आणि राज यांची ही दुसरी भेट आहे. यापूवच्या भेटीत दोन्ही नेत्यांनी कौटुंबिक आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता महापालिका निवडणुका जवळ येत असताना या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही शिवसेना आणि मनसेसाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यास मतविभागणी होऊन शिंदे गटाला फायदा होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर उद्धव-राज युतीच्या चर्चांना वेग आला आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांना जन्म दिला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत ही युती प्रत्यक्षात आली, तर शिंदे गट आणि भाजप यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. येत्या काही दिवसांत या भेटीचे परिणाम आणि राजकीय हालचाली यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिंदे सेनेला धक्का बसणार?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी यापूवही एकत्र येण्याबाबत संकेत दिले होते. आता ही भेट प्रत्यक्षात घडल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेना आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीमुळे मुंबई आणि ठाण्यासह इतर महापालिकांमध्ये निवडणूक लढवण्याची रणनीती ठरू शकते. यामुळे सत्ताधारी शिंदे गट आणि भाजप यांच्यासमोरील आव्हाने वाढण्याची शक्यता आहे. उद्धव-राज यांच्या भेटीमुळे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. मनसे इंडिया आघाडीत सामील होणार का? की महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर उद्धव आणि राज एकत्र लढणार? याबाबत राजकीय विलेषकांमध्ये चर्चा सुरू आहे. दोन्ही नेत्यांनी यापूव एकत्र येण्याचे संकेत दिले असले, तरी युतीच्या स्वरूपाबाबत स्पष्टता नाही. या भेटीतून याबाबत काही ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.