spot_img
अहमदनगरअहमदनगरमधील दोन भाविक ठार! सहाजण गंभीर जखमी; कुठे घडला अपघात?

अहमदनगरमधील दोन भाविक ठार! सहाजण गंभीर जखमी; कुठे घडला अपघात?

spot_img

Accident News: रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी माहुर गडावर गेलेलया भाविकांच्या कारचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अपघातात अहमदनगर मधील दोघेजण जागीच ठार तर सहाजण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात आज सोमवारी ७ च्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील पुसद-वाशिम महामार्गावरील सत्तरमाळ घाटात घडला आहे.

अहमदनगर येथील ८ भाविक रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी माहुर गडावर गेले होते. दर्शन घेऊन पुसद मार्ग ते नगरकडे परतत होते. पुसद-वाशिम महामार्गावरील सत्तरमाळ घाटात कार आली असता, अचानक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत दोन भाविकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जातं आहे. अद्याप मृतक आणि जखमी यांची नावे कळू शकली नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षण; सरकारसमोर मोठं आव्हान; कोर्टात ‘या’ गोष्टी सिद्ध कराव्या लागणार

Maratha Reservation : तर मराठा सामाजासाठी एसईबीसीचा जो मध्यममार्ग सरकारने शोधला होता. त्याचावर वक्रदृष्टी...

विधानसभेतील गद्दारांना योग्य ती शिक्षा मिळणार; खा. लंके यांचे आगामी निवडणुकाबाबत मोठे वक्तव्य

पारनेर । नगर सहयाद्री स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार करत खासदार नीलेश...

शेवगाव, पाथर्डीतील मावा विक्रेत्यांवर छापे; ४ आरोपींना अटक

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यांमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर मावा व...

२६ गोवंशीय जनावरांची सुटका; पोलिसांनी ‘असा’ लावला सापळा, ३ आरोपींसह मुद्देमाल ताब्यात

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे आणलेल्या २६ गोवंशीय जनावरांची...