spot_img
अहमदनगर'साक्षीदार' तुला ट्रकनं उडवून देणार?; रेखा जरे हत्याकांडातील साक्षीदाराला संपवण्याचा कट

‘साक्षीदार’ तुला ट्रकनं उडवून देणार?; रेखा जरे हत्याकांडातील साक्षीदाराला संपवण्याचा कट

spot_img

रेखा जरे हत्याकांडातील सरकारी साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी
अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
गेल्या तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या रेखा जरेह त्याकांडातील सरकारी साक्षीदार डॉ. विजय मकासरे यांना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी साक्षीदार डॉ. विजय मकासरे (वय ४०, रा. वळण, ता. राहुरी) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवार दि,०६ रोजी कामानिमित चारचाकी वाहनाने साक्षीदार मकासरे नगरकडे जात होते. दरम्यान शेंडी बायपास जवळ त्यांची चारचाकी विनानंबरच्या बुलेटवरून आलेल्या दोघा हेल्मेटधारी अज्ञात इसमांनीअडवली. ‘तू रेखा जरे हत्याकांडात सरकारी साक्षीदार आहे ना? आमच्या बाजूने साक्ष दे.

आमच्या विरोधात साक्ष दिल्यास तुला ट्रकनं उडवून देऊ,’ अशी धमकी देत ते अज्ञात निघून गेले. याबाबत मकासरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी अदखलपात्र गुह्याची नोंद केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मान्सूनची पुन्हा गर्जना; ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon:वेळेआधीच दाखल मान्सूनने यंत्रणांची पोलखोल केली आणि मान्सून पुन्हा गायब झाला.. मात्र 3...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या लोकांनी सावध रहा, तुमची प्रगती त्यांना सहन होत नाही

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालीम लसीकरण लाभदायी...

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...