spot_img
अहमदनगरAhmednagar News : देहरेत सराफाचे दोन दुकान फोडले, दागिने लंपास

Ahmednagar News : देहरेत सराफाचे दोन दुकान फोडले, दागिने लंपास

spot_img

अहमदनगर / नगरसह्याद्री :
Ahmednagar News :  नगर तालुक्यातील देहरे गावातील सराफ दुकान फोडल्याची घटना काल (दि.१९ डिसेंबर) रात्री घडली. मध्यरात्रीच्या सुमारास चोरटयांनी दुकानात प्रवेश करत दागिने चोरले. दुसऱ्या एका दुकानाचे शटर उचकले होते.

यात सहा ते सात हजारांचे दागिने चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दुपारी उशिरापर्यंत पंचनामा व तपासाचे काम सुरु होते.

अहमदनगर शहरात सराफ बाजारातील वर्मा ज्वेलर्सचे दुकान फोडल्याची घटना ताजी असतानाच आता ही घटना घडली. भर शहरातून वर्मा ज्वेलर्समधून लाखोंचे दागिने चोरटयांनी लांबवले होते. यातील आरोपींना पोलिसांनी बेड्या घातल्या होत्या.

परंतु आता पुन्हा एकदा सराफाचे दुकान फोडल्याने सराफ व्यावसायिक चिंतीत झाले आहेत. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, गस्त वाढवावी अशी मागणी केली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोर्टात रक्तरंजित थरार! न्यायाधिशांसमोरच महिलेच्या डोक्यात कुऱ्हाड घातली, कुठे घडला प्रकार

कोल्हापूर / नगर सह्याद्री - कोर्टामध्ये सुनावणीदरम्यान न्यायाधिशांसमोच एका महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक...

साडेतीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून; आरोपीला भर चौकात फाशी द्या

अत्याचार करणाऱ्या नराधमाला एक महिन्यात फाशीची शिक्षा होणे गरजेचे - आ. संग्राम जगताप अहिल्यानगर /...

महायुतीत खटकाखटकी! NCP कडून शिंदेसेनेचा टप्प्यात कार्यक्रम! उमेदवारच अजित पवारांच्या पक्षात गेला अन्…

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी केलेले अर्ज मागे घेण्यास आजपासून...

सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय ; माजी आमदारपुत्राचं अजित पवारांना खुले आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं

सोलापूर / नगर सह्याद्री - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक...