spot_img
राजकारणसुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचे निलंबन ! संसदीय इतिहासात प्रथमच 142 खासदार...

सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचे निलंबन ! संसदीय इतिहासात प्रथमच 142 खासदार निलंबित

spot_img

नवी दिल्ली / नगरसहयाद्री : संसदेत घुसखोरी प्रकरणावरून वातावरण चांगलेच तापले आहे. संसदेतील सुरक्षायंत्रणा भेदण्याच्या मुद्द्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सदेत येऊन निवेदन करावे, या मागणीसाठी विरोधी खासदार गदारोळ घालत आहेत.

त्यामुळे दोन्ही सभागृहातील खासदानवर निलंबनाची कारवाई सुरु आहे. आज. खा. सुप्रिया सुळेंसह लोकसभेतील ४९ खासदारांना आज निलंबित करण्यात आले. लोकसभा आणि राज्यसभेतून सोमवारी विरोधी पक्षांच्या तब्बल ७८ खासदारांना अधिवेशनकाळासाठी निलंबित करण्यात आले होते.

त्यानंतर आज लोकसभेच्या आणखी ४९ खासदारांचे निलंबन करण्यात आले. एकाच अधिवेशनात विरोधी पक्षांच्या खासदारांना एवढ्या मोठ्या संख्येने संसदेबाहेरचा रस्ता दाखवण्याचा देशाच्या संसदीय इतिहासातील हा पहिलाच प्रसंग असल्याचे बोलले जात आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, लोकशाहीच्या मार्गानं आम्ही निवडून आलो आहोत पण दडपशाही सुरु झाली आहे. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त खासदार निलंबीत केले गेले आहेत. संसदेत झालेल्या घुसखोरी प्रकरणी आम्ही चर्चेची मागणी केली. पण प्रश्न विचारणारे बाहेर आहेत. सत्ताधाऱ्यांना विरोधक नको आहेत, त्यामुळे निलबंनाची कारवाई करण्यात आली असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटात धनंजय मुंडेंच्या समर्थकाला अटक, तिसऱ्याला रात्री उशिरा उचलला

जालना । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट...

शेतकर्‍यांना खुशखबर मिळणार! केंद्र सरकार आज मोठी घोषणा करणार?

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी २१व्या हप्त्याची खूप दिवसांपासून वाट...

आजचे राशी भविष्य ! आजचा दिवस कुणासाठी आहे खास?, कुणाला मिळणार यश? जाणून घ्या…

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या....

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...