spot_img
महाराष्ट्रराजकारणात पुन्हा ट्विस्ट ! शिंदे गटातील शिवसेनेचे 'हे' दिग्गज नेते अजित पवार...

राजकारणात पुन्हा ट्विस्ट ! शिंदे गटातील शिवसेनेचे ‘हे’ दिग्गज नेते अजित पवार गटात ?

spot_img

पुणे / नगर सह्यादी : लोकसभा निवडणुकीला काही महिन्यांचाच अवधी राहिला आहे. राजकारणात त्यामुळे अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.

राजकीय उलथापालथीमुळे मतदारसंघांतील समीकरणे बदलली आहेत. आता आणखी एक ट्विस्ट समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून आगामी लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

ते शिरूर मतदार संघात येतात. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील शिंदे गटात गेले. शिरूर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटील तीन वेळा खासदार राहिले आहेत.

पण आता या लोकसभेवर भाजपकडून दावा सांगितला जातोय. भाजप आमदार महेश लांडगे हे या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असल्याची चर्चा कायम रंगत असते. दुसरीकडे, राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे हे शरद पवार गटात गेले.

सध्या या मतदारसंघात राष्ट्रवादीचा खासदार असल्याने लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीच्या जागावाटपात अजित पवार यांच्याकडून या जागेवर दावा सांगितला जाऊ शकतो. त्यामुळे कोल्हे यांच्याविरोधात लढण्यासाठी आढळराव पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचाही विचार करू शकतात. परंतु या घडामोडींवर मात्र त्यांनी प्रतिक्रिया देणार नसल्याचं सांगितलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...