जालना। नगर सह्याद्री-
मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील मुबंईकडे पुन्हा कूच करत आहे. कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत सागर बंगल्यावर जाणार असा इशाराही त्यांनी दिला होता.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सागर बंगल्यावरील पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला असून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहे.
दरम्यान सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी पहाटे अचानक पोलीस पथक जालन्यात धडकले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक श्रीराम कुरणकर, शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे यांना ताब्यात घेतले आहे