spot_img
अहमदनगरआजचे राशी भविष्य! 'या' राशींचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सुटणार

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सुटणार

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
मेष राशी भविष्य
आज तुम्हाला आपल्या भाऊ-बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे. अनुरुपांसाठी वैवाहिक संबंध जुळून येतील. तुम्हाला जीवनसाथी मिळाल्यामुळे दीर्घकाळ असणारी उदासवाणी एकाकी अवस्था संपून जाऊन वातावरण उत्साही बनेल. रोजच्यापेक्षा आज तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील. आपल्या वेळेची किंमत समजा. त्या लोकांच्या मध्ये राहू नका ज्यांच्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही आणि चुकीची आहे.

मिथुन राशी भविष्य
आपल्या मद्यापानाच्या सवयीवर ताबा मिळविण्यासाठी शुभ दिवस आहे. मद्यापान हा तुमच्या आरोग्याचा सर्वात वाईट शत्रू आहे, त्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल. आज कुठल्या पार्टीमध्ये तुमची भेट अश्या व्यक्ती सोबत होऊ शकते जे आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला महत्वाचा सल्ला देऊ शकतो. वयोवृद्ध नातेवाईक अवाजवी मागण्या करण्याची शक्यता आहे. तुम्हाला जिथे बोलण्याची गरज नाही तिथे तुम्ही बोलू नका. जबरदस्ती बोलण्याच्या कारणाने तुम्ही स्वतःला चिंतेत टाकू शकतात.

सिंह राशी भविष्य
घरात काम करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. घरगुती वस्तुंची बेफिकीरपणे हाताळणी करणे तुम्हाला अडचणीत टाकू शकते. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. तुमच्या प्रिय व्यक्तीकेड दुर्लक्ष केल्याने घरात काही तणावाचे क्षण अनुभवास येतील.

तुळ राशी भविष्य
आरोग्य चांगले राहील. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. मुलांमुळे आजचा दिवस खूप कठीण होण्याची शक्यता आहे. तुमच्या शत्रूंना त्यांच्या कुकर्मांचे परिणाम आज भोगावे लागणार आहेत. या राशीतील लोकांना आजच्या दिवशी आपल्यासाठी वेळ काढण्याची अधिक आवश्यकता आहे जर, तुम्ही असे केले नाही तर, तुम्हाला मानसिक समस्या होऊ शकतात. तुमचा/तुमची जोडीदार आज तुम्हाला तळहातावरच्या फोडासारखं जपेल.

धनु राशी भविष्य
शारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. सुयोग्य कर्मचा-यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कदाचित वाद घालाल.

कुंभ राशी भविष्य
आरोग्यासंदर्भातील कोणत्याही प्रश्नावर दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. घरगुती कामं कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी असतील. प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाल टिकणारा असेल. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल.

वृषभ राशी भविष्य
अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. पण आरोग्यालाल गृहित धरू नका. आयुष्याची काळजी घेणे ही आपली गरज आहे. आज आर्थिक पक्ष चांगले राहील परंतु, यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की, तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. आजचा दिवस अत्यंत महान आहे, कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल, ते तुम्हास हवे असेल. आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील. तुम्ही प्रेमात पोळून निघालात तरी हळूहळू प्रेम मिळविण्यात यशस्वी व्हाल.

कर्क राशी भविष्य
खेळावर काही रक्कम खर्च करा, कारण निंरतर चिरस्थायी तरुणाईचे ते गुपित आहे. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील – त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. मुलांकडून गोड बातमी समजल्यानंतर आनंदी व्हाल. पाहताक्षणी तुम्ही प्रेमात पडण्याची शक्यता आहे. तुमचा/तुमची जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे, या क्षणांचा आनंद लुटा. प्रलंबित अडचणीचे प्रश्न लवकरात लवकर सुटणार आहे.

कन्या राशी भविष्य
कामाच्या धबडग्यात मधेमध्ये थोडा आराम करा, विश्रांती घ्या आणि रात्रीची जागरणे टाळा. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. घरातील कुणी सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतीत राहू शकतात. तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे. व्यावसायिकांना चांगला दिवस. आजचा दिवस हा तुमच्यासाठी ‘मर्यादा सोडून वागण्याचा’ दिवस आहे! प्रेम आणि रोमान्स करताना तुम्ही सीमा गाठणार आहात.

वृश्चिक राशी भविष्य
तुम्ही काही नवीन गोष्ट शिकण्यासाठी योग्य नाहीत, खूप म्हातारे झाला आहात असे काही लोकांना वाटेल – परंतु ते खरे नाही – तुम्ही नवीन गोष्टी सहजपणे आत्मसात करू शकता कारण तुम्ही चाणाक्ष आहात आणि तुमचे मन कार्यरत असते. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकतात परंतु, तरी ही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा. आजची सायंकाळ रोमॅण्टीक करण्याचा पुरेपुर प्रयत्ना करा. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल.

मकर राशी भविष्य
आज तुमची प्रकृती फारशी बरी नसल्यामुळे तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करणे जड जाईल. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार याची काळजी घ्या, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा. आजच्या दिवशी तुमच्या कामात प्रगती झालेली दिसून येईल.

मीन राशी भविष्य
आज केलेली गुंतवणूक लाभदायक असेल, पण आपल्या भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी-विद्यार्थिनींना आजचे काम उद्यावर नाही टाकले पाहिजे. तुम्हाला जेव्हा ही रिकामा वेळ मिळेल आपले काम पूर्ण करा. असे करणे तुमच्यासाठी हिताचे आहे. आज तुमच्या कामाची आज स्तुती होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....