spot_img
ब्रेकिंगRashibhavishya : आजचे राशी भविष्य ! तूळ आणि ‘या’ राशींना 'असा' जाणार...

Rashibhavishya : आजचे राशी भविष्य ! तूळ आणि ‘या’ राशींना ‘असा’ जाणार आजचा दिवस

spot_img

मुंबई । नगर सह्याद्री –

मेष राशी भविष्य

मित्राबाबत गैरसमज झाल्याने अनवस्था प्रसंग, नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल – म्हणून कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा. जे लोक दुधाच्या व्यवसायाने जोडलेले आहे त्यांना आज आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे. नातेवाईक/मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. प्रेमात तोंडघशी पडलात तरी आनंदी रहा आणि धैर्य बाळगा.

मिथुन राशी भविष्य

मानसिक भीतीने तुम्ही घाबरून जाल. सकारात्मक विचार आणि उजळ बाजू विचारात घेतली तर भीती दूर लोटू शकाल. तुमच्या जवळ आज पैसा ही पर्याप्त असेल आणि या सोबतच मनात शांती असेल. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. प्रणयराधना करण्याची भावना जोडिदाराकडून आज अनुभवता येईल.

सिंह राशी भविष्य

तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु, सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. भविष्यात जर तुम्हाला आर्थिक रूपात मजबूत बनायचे आहे तर, आज पासूनच धन बचत करा. आपल्या भावाला परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी मदत करा. संघर्षाला विनाकारण हवा देऊ नका, त्याऐवजी खेळीमेळीने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्ना करा.

तुळ राशी भविष्य

उच्च कॅलरी असणारा आहार टाळा, आपल्या व्यायामाबद्दल आपुलकी, प्रामाणिकपणा असू द्या. कुणी ही अनुभव नसलेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने आज असे कुठले ही काम करू नका ज्यामुळे तुम्हाला आर्थिक हानी होईल. नव्या घटनांवर लक्ष केंद्रीत करा, आपल्या मित्रांकडून मदत मिळवा. आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणे टाळा. काहीजणांची व्यावसायिक प्रगती होईल.

धनु राशी भविष्य

योगासने आणि ध्यानधारणा यामुळे तुमच्या शरीराला आकार मिळेल आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम राहाल. आज तुम्ही धन संबंधाने जोडलेल्या समस्यांच्या कारणाने चिंतीत राहू शकतात यासाठी तुम्हाला आपल्या कुठल्या विश्वासपात्रचा सल्ला घेतला पाहिजे. प्रत्येकाच्याच गरजा पुºया करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल तर अनेक दिशांमध्ये अनेक बाजूंनी तुम्ही ओढाताण होईल.

कुंभ राशी भविष्य

सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. तुमच्या पालकांना आनंदी ठेवणे तुम्हाला कठीण वाटेल. म्हणून सकारात्मक निकाल मिळण्यासाठी तुम्ही पालकांच्या दृष्टिकोनातून पाहा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा.

वृषभ राशी भविष्य

आज तुमचा विश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल. पैश्याची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात म्हणून आजच्या दिवशी तुमच्या द्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणींमधून निघू शकतात. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल.

कर्क राशी भविष्य

तुमची उच्च कोटी ऊर्जा आज चांगल्या कामासाठी वापरा. ज्या व्यापाऱ्यांचे संबंध परदेशात आहे त्यांना आज धन हानी होण्याची शक्यता आहे म्हणून, आज विचार पूर्वक निर्णय घ्या. कुटुंबिय अथवा मित्रांबरोबरील स्नेहमेळाव्यामुळे आजचा दिवस एकदम उत्तम आणि छान जाईल. लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्त्रोत आहे याचा अनुभव मिळेल.

कन्या राशी भविष्य

आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हसित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील – त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाल शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील.

वृश्चिक राशी भविष्य

गरज नसलेल्या अशक्य गोष्टींवर विचार करण्यात तुमची शक्ती खर्च करू नका, त्यापेक्षा इतर योग्य कामासाठी तिचा वापर करा. आकर्षक वाटणा-या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. अडचणीच्या प्रसंगी तुमचे कुटुंब तुमच्या बचावासाठी धावून येतील आणि तुम्हाला मार्गदर्शन करतील. इतरांचे वागणे पाहून त्यातून तुम्हाला काही धडा शिकता येईल. आत्मविश्वास मजबूत करणे हे कमालीचे मदतगार ठरू शकते.

मकर राशी भविष्य

आपला संयम ढळू देऊ नका, विशेषत: कठीण समयी नियंत्रण ठेवा. जर तुम्ही यात्रेवर जाणार असाल तर आपले किमती वस्तूंची काळजी घ्या कारण, चोरी होण्याची शक्यता आहे. खासकरून आपली पर्स व्यवस्थित सांभाळा. आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी इतर आउटडोअर उपक्रमांकडे असणा-या मुलांच्या ओढ्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते.

मीन राशी भविष्य

आरोग्य एकदम चोख असेल. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवतात ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. प्रभावी ठरणाºया आणि महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल.

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विधानसभा निवडणुका कधी? CM शिंदे यांनी सांगितली महत्वाची माहिती..? महायुतीच्या फॉर्मुल्यावर मोठं वक्तव्य…

मुंबई । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महत्त्वाचे संकेत...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज! ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेर्‍यासह..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- नगर शहरासह जिल्ह्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात...

दीपिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज, चिमुकल्या परीसह घरी परतले ‘माता-पिता’

Deepika Padukone: प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला आज (रविवारी) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दीपिका...

एसटी महामंडळाचा ‘मोठा’ निर्णय; ‘लालपरी’ मध्ये अडचण आल्यास करा ‘हे’ काम!

मुंबई : नगर सह्याद्री:- प्रवाशांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी एसटी महामंडळाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला...