spot_img
अहमदनगरकोटींची बिले थकली? ठेकेदारानी दिला मोठा इशारा, अत्ता शहरात 'ती' सुविधा होणार..

कोटींची बिले थकली? ठेकेदारानी दिला मोठा इशारा, अत्ता शहरात ‘ती’ सुविधा होणार..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
शासनाकडून वित्त आयोगाचे अनुदान अद्याप आलेले नाही. वसूली ठप्प असल्याने मनपाकडेही पैसे नाहीत. परिणामी, शहरात कचरा संकलन करणार्‍या श्रीजी एजन्सी या संस्थेची चार महिन्यांची बिले, तीन महिन्यांच्या बीलातील राखीव रक्कम व वाहन दुरुस्तीच्या खर्चाची एकूण पाच कोटी रुपयांची बिले थकली आहेत. आर्थिक अडचणीमुळे काम सुरू ठेवणे शय नाही, घंटा गाड्यांसाठी डीझेलही मिळणे मुश्कील झाल्याचे सांगत तत्काळ थकीत बिले न मिळाल्यास १० मार्चपासून शहरातील कचरा संकलनाचे काम बंद करणार असल्याचे ठेकेदार संस्थेने जाहीर केले आहे.

शहरात सध्या ९० गाड्यांद्वारे घरोघरी, हॉटेलमधून, कचरा कुंड्यांमधून कचरा संकलन केले जाते. या कामाची नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी महिन्याची सुमारे चार कोटी रुपयांची बिले थकली आहेत. तसेच यापूर्वीच्या बिलातील सुमारे ६० लाख रुपये थकीत आहेत. मनपाच्या वाहनांच्या दुरुस्ती खर्चाचे सुमारे ४५ लाख रुपये थकीत आहेत. मागील महिन्यात मनपाकडून अवघे ७० लाख रुपये अदा झाले.

मात्र, अद्यापही ५ कोटींची बिले थकीत असल्याने कचरा संकलन व्यवस्थेवर, कर्मचार्‍यांच्या पगारावर होणारा दैनंदिन खर्च होऊ शकत नाही. त्यामुळे १० मार्चपासून शहरातील सर्व कचरा संकलन सेवा बंद करण्यात येणार असल्याचे श्री जी एजन्सी च्यावतीने मनपाला कळवण्यात आले आहे. दरम्यान, मनपाकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने शहरात कचरा संकलन ठप्प होऊन कचरा कोंडी होण्याची शयता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘स्थानिक स्वराज्य’ संस्थांच्या निवडणुकीबाबत मंत्री विखे पाटलांचे महत्वाचे स्टेटमेंट; लवकरच..

स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लवकरच; प्रदेशाध्यक्ष आ.चव्हाणांना दिल्या शुभेच्छा   शिर्डी । नगर सहयाद्री  पंतप्रधान नरेंद्र मोदी...

मुहूर्त ठरला; शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ‘या’ तारखेला ‘सर्वोच्च’ सुनावणी

मुंबई । नगर सहयाद्री:- शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या पारंपरिक निवडणूक चिन्हाच्या मालकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गेल्या दोन...

विधानसभेत गरजला पारनेरकरांचा आवाज! आ. दाते यांनी मांडला ‘तो’ प्रश्न; वेधले शासनाचे लक्ष

पारनेर । नगर सहयाद्री :- पारनेर-नगर मतदारसंघातील सुपा पासून खडकी, खंडाळ्यासह जिल्ह्यातील विविध भागात दि...

श्रीराम चौकातील मावा बनवणाऱ्या कारखान्यांवर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री नगर शहरात सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करणाऱ्या अवैध कारखान्यांवर अहिल्यानगर...