spot_img
ब्रेकिंगTips and Tricks : दुसऱ्या नंबरवर UPI पेमेंट झाले? 'अशा' प्रकारे मिळवा...

Tips and Tricks : दुसऱ्या नंबरवर UPI पेमेंट झाले? ‘अशा’ प्रकारे मिळवा परत

spot_img

Tips and Tricks : बेकिंग क्षेत्रात विविध प्रकारचे सातत्याने बदल घडत आहे. इंटरनेटच्या जमान्यात अनेक जण ऑनलाइनचा आधार घेतात त्यामुळे पैशाची देवाण- घेवाण अगदी सोप्पी झाली आहे. मात्र अनेकदा ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना अनेक वेळा घाईगडबडीत चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात आणि अशा परिस्थितीत आपल्या मनात धग-धग सुरु होते. अनेकांना पैसे कसे परत मिळावावे, हे माहित नसते. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज देखील नाही, दिलेल्या स्टेप्स लक्षात ठेवा.

सर्वप्रथम, तुम्हाला NPCI लिहून Google वर शोधायचे आहे, शोध परिणाम दिसल्यानंतर, पहिल्या लिंकवर क्लिक करा. NPCI ची अधिकृत साइट उघडल्यानंतर, तुम्हाला वरच्या डाव्या बाजूला असलेल्या तीन डॉट मेनूवर क्लिक करावे लागेल.

तुम्ही थ्री डॉट मेनू आयकॉनवर क्लिक करताच तुमच्यासमोर अनेक पर्याय उघडतील, तुम्हाला तळाशी असलेल्या गेट इन टच विभागात जावे लागेल. या विभागात तुम्हाला UPI तक्रार पर्यायावर क्लिक करावे लागेल.

UPI कम्प्लेंट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्रान्झॅक्शन ऑप्शनवर जावे लागेल, या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातील. स्क्रीनवर विचारलेल्या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे भरल्यानंतर सबमिट करा.

UPI तक्रार दाखल केल्यानंतर, तुमचे पैसे काही तासांत तुम्हाला परत मिळतील. अशा प्रकारे, भारत सरकारच्या या अधिकृत साइटच्या मदतीने, तुम्ही चुकीच्या खात्यात हस्तांतरित केलेले पैसे परत मिळवू शकता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून मुलीसमोरच आईची केली हत्या

अकोला / नगर सह्याद्री - अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या...

मुली गरिबांना द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका हो!:गौरी गर्जेच्या वडिलांनी फोडला टाहो..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या...

सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपला; सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन

मुंबई । नगर सहयाद्री :- धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही...

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; प्रशासनाकडून हिरवा कंदील, आता डबल गिफ्ट मिळणार?

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया...