spot_img
अहमदनगरAhmadnagar Politics: जलनायक व्हा किंवा खलनायक व्हा..! मंत्री विखे पाटील यांनी साधला...

Ahmadnagar Politics: जलनायक व्हा किंवा खलनायक व्हा..! मंत्री विखे पाटील यांनी साधला विरोधकांवर निशाणा

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री –
Ahmadnagar Politics: केंद्र सरकारच्या योजनांच्‍या माध्‍यमातून विविध क्षेत्रात क्रांतीकारी बदल झाला आहे. योजना केंद्राच्या आणि फोटो भलत्यांचेच असे चित्र तालुक्यात दिसून येत असून कोणाला जलनायक व्हायचं किंवा खलनायक व्हायचं ते होऊ द्या आपण जनतेसाठी काम करायचं अशा शब्दात महसूल मंत्री विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री थोरात यांच्या जलनायक म्हणून लागलेल्या फ्लेक्सवरून निशाणा साधला आहे.

संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे पालकमंत्री विखे पाटील यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम तसेच निळवंडे धरण कालव्याचे जलपूजन विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारची झालेली यशस्‍वी वाटचाल विकसनशिल भारताच्‍या प्रगतीचा मार्ग ठरला आहे. गोरगरीब जनतेचा स्वाभिमान जागृत करणे आणि त्याचा आवाज आला पाहिजे यासाठी ही संकल्प यात्रा आहे.

योजनांच्‍या माध्‍यमातून विविध क्षेत्रात झालेल्‍या क्रांतीकारी बदल झाले आहे. योजना पंतप्रधान मोदींच्या आणि फोटो भलत्यांचेच असे चित्र या संगमनेर तालुक्यात दिसून येत आहे. तालुक्याचा ताबा ठेकेदारांनी घेतला आहे. पाणीपुरवठा, रस्ते, शौचालय, कारखाना संच‍ालक, पुढारी सर्व तेच आहे.

कोणाला जलनायक व्हायचं किंवा खलनायक व्हायचं ते होऊ द्या आपण जनतेसाठी काम करायचं असा टोला महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री थोरात यांच्या जलनायक म्हणून लागलेल्या फ्लेक्सवरून लगावला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हनी ट्रॅपचा धक्कादायक प्रकार! ‘जीवनसाथी डॉट कॉम’ बनावट आयडी, पुढे घडलं असं काही..

मुंबई । नगर सहयाद्री:- हनी ट्रॅपचा वापर करत ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या वेबसाइटवरून महिलांना...

महायुती सरकारचा धडाकेबाज निर्णय; गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणं हटवणार

मुंबई। नगर सहयाद्री:- महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेतले आहे. साच एक...

लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! २१०० रुपये कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली आहे....

आयुक्त साहेब, चमकोगिरी नको फिल्डवर काम दाखवा; कोतकर काय म्हणाले पहा…

मनोज कोतकर | मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट | आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर शहरात भटया...