श्रीरामपूर। नगर सहयाद्री-
एक भीषण अपघाताची घटना समोर अली आहे. श्रीरामपूर शहरातील नेवासा रोडवरील उड्डाणपूलावर अपघात घडला. अपघातामध्ये २५वर्षांच्या तरुणांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.
अजय फोपसे, (रा. गोंडेगाव. ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर ) असे मृत युवकाचे नाव आहे. अजय फोपसे एका नामांकित फायनान्स कंपनीमध्ये जॉब करत होते. कंपनीच्या कामानिम्मित त्याच्या सहकाऱ्यांसोबत जात होते.
दरम्यान नेवासा रोडवरील उड्डाणपूलावरएका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.वाहनाच्या जोरदार धडकेत त्याचा मृत्यू झाला. एका होतकरू तरुणाच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त होत होती.