गोंदिया / नगर सह्याद्री : लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या तवेरा गाडीला अपघात झाला. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
लग्नाची वरात घेऊन जात असताना हा अपघात झाला असून अपघातामधील जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यांतर्गत येत असलेल्या एकोडी दांडेगाव याठिकाणी हा अपघात झाला. हे सगळे गोंदिया तालुक्यातील जुनेवाणी इथं जात होते. यावेळी दांडेगावच्या चौकात ही घटना घडली.
या घटनेची पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. त्यानंतर गंगाझरी पोलीस घटना स्थळी झाले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहेत. दरम्यान मागील काही दिवसात अपघतांची संख्या वाढीस लागली आहे.