नगर सह्यद्री टीम-
काही दिवसापासून पुन्हा कोरोना व्हायरस JN.1 चे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहे. वाढत्या रुग्णाची संख्या लक्षात घेता या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून आरोग्य विभाग अलर्ट झाले आहे. अनेकांच्या मनात कोरोना व्हायरस JN.1 बाबत प्रश्न निर्माण होत आहेत. महत्वाचे म्हणजे अनेकांच्या पुढे कोरोनाचा धास्ती घेत चौथ्या लसीकरणाचा डोस घ्यावा लागणार का? असा सवाल उपिस्थत होत आहे.
देशातील इतर राज्यातही कोरोना व्हायरसच्या जेएन-१ व्हेरियंटचे रुग्ण आढळत आहेत. देशात आतापर्यंत याची लागण झालेले ८३ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील देखील अनेक रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.कोविड प्रकरणांमध्ये वाढ होत असताना, लसीबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
लसीचा चौथा डोस आवश्यक आहे का ?
देशातील SARS-CoV-2 Genomics Consortium म्हणजेच INSACOG च्या एका प्रमुख डॉकटरच्या म्हणण्यानुसार, सध्या देशात कोरोना लसीच्या चौथ्या डोसची गरज नाही. जरी प्रकरणे वाढत असली तरी, कोणताही गंभीर धोका नाही, तथापि, ज्या लोकांना कोणताही गंभीर आजार आहे किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत, ते संरक्षणासाठी तिसरा डोस म्हणजे बूस्टर डोस घेऊ शकतात. जेएन.1 प्रकार हा ओमिक्रॉनचा उप-प्रकार आहे आणि भारतात ते फारसे धोकादायक दिसत नाही.