spot_img
अहमदनगर'महसूलमंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातुन तीन कोटी निधी'

‘महसूलमंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातुन तीन कोटी निधी’

spot_img

सागर मैड यांची पत्रकार परिषदेत माहिती

सुपा | नगर सह्याद्री

पारनेर तालुक्यातील सुपा गावात येत्या काळात मोठ्या प्रमाणावर विकास कामांसाठी निधी प्राप्त झाला आहे. नुकताच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातुन व नाम उदय सामंत यांच्या आदेशावरून सुपा गावचे माजी उपसरपंच तथा भाजपा युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस सागर भास्कर मैड यांच्या अथक प्रयत्नातून तीन कोटी रुपये निधी मंजूर झाल्याचे खासदार सुजय दादा विखे पाटील यांनी पारनेरमध्ये बोलताना जाहीर केले. याबाबत सागर मैड, तालुकाध्यक्ष राहूल पाटील शिंदे, अमोल मैड यांनी सुपा येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

सुपा गावातील वाढते अपघात व सुपा परिसरातून एमआयडीसीमध्ये कामानिमित्त ये-जा करणारे लोक मोठ्या प्रमाणावर असतात, कंपन्यांमध्ये तीन शिप असल्याने रात्रीच्या वेळी जाणार्‍या कामगारांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अनुषंगाने एमआयडीसी चौक ते सुपा गावठाण व सुपा गावठाण ते पवारवाडी सुपा या ठिकाणी अंदाजे तीन ते साडेतीन किलोमीटर हायवे रस्त्याच्या मधोमध दुभाजकावर नऊ मीटर उंचीचे पथदिवे बसवण्यासाठी मागणी केली होती. पण ही मागणी करत असताना गाव पातळीवर एवढा मोठा निधी मंजूर करून आणणे हे थोडे जिकरीचे होते. सुपा येथे औद्योगिक नगरी आहे, यासाठी नियमावलीत वेगळी तरतूद आहे.

याचा संपूर्ण अभ्यास करत सदर निधी हा एमआयडीसी कडून मिळणे शक्य असल्याचे सागर मैड यांना जाणवले. आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली. त्या आशयाचे पत्र प्रथमता माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माननीय नामदार उदय सामंत यांना देण्यात आले व त्याची प्रत खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील यांना देण्यात आली होती व पुढील पाठपुरावा सुरू असताना एमआयडीसीचे अनेक अधिकार्‍यांशी यांनी त्या संदर्भात सकारात्मक चर्चा सुरू होती. पण त्यात आणखी ताकदीची गरज होती.

त्या दृष्टीने हा विषय महसूल मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना याविषयी अभ्यासपूर्ण मांडणी केली असता, ती समजून घेऊन, उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्या नावे पत्र काढले. सदर पत्रात या विकास कामासाठी तातडीने निधी मंजूर होण्याचे आदेश संबंधितांना करावे अशी विनंती करण्यात आली. त्यावर तातडीने सूत्र फिरले आणि अवघ्या चार महिन्याच्या कालावधीत तब्बल तीन कोटी रुपये मंजूर झाले.

या विकास कामासाठी नगर, पुणे, मुंबई येथिल एमआयडीसी च्या सर्व अधिकारी वर्गाने मोलाचे सहकार्य केले. या विकास कामासाठी ते सकारात्मक भूमिकेत होते आणि ती जलद गतीने मंजूर होण्यासाठी त्यांनीही योग्य भूमिका मांडली. मान नाम राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मागणीने व खासदार विखे पाटील यांच्या शिफारशीने नाम उदय सामंत साहेब यांनी हा निधी वर्ग करण्याचे आदेश दिले. त्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे सागर मैड यांनी सांगितले.

हे विकास काम मंजूर झाल्याचे कळताच खासदार सुजय दादा विखे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत यांचे मनापासून आभार मानले. सागर मैड यांच्या पाठपुराव्याने सगळे विषय शेवटच्या टप्प्यात आणले आहे. हे सर्व विकासकामांच्या बाबत लवकरच सुपा गावात एक मोठा कार्यक्रम घेऊन विकास कामांचे लोकार्पण करणार असल्याचे खासदार सुजय विखे पाटील यांनी शुक्रवारी पारनेर येथे जाहीर केले.

सर्व विकास कामासंदर्भात नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील भारतीय जनता पार्टी कणखरपणे पाठीशी उभी असल्याचे सांगितले होते.यावेळी भाजपा विधान सभा प्रमूख विश्वनाथ कोरडे, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल दादा शिंदे पाटील, सरचिटणीस भाजयुमो पारनेर तालुका तथा मा. उपसरपंच सागर भास्करराव मैड, मधुकर पठारे, अमोल भास्करराव मैड, सचिन मोहिते, बाळासाहेब शिंदे, सर्व पदाधिकारी सहकारी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...

अहमदनगर ब्रेकिंग! तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात! ‘असा’ लावला सापळा

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी...

कांद्याची महाबँक: उल्लू बनविणारा प्रयोग!अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना गंडवले

अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना...

बागुल पंडुगू सण तुम्हा माहित आहे का? नगरमध्ये केला जातो उत्साहात साजरा

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर शहरात बागुल पंडुगू सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील तोफखाना...