spot_img
ब्रेकिंगAhmednagar: सैनिकाला मारहाण..; नगरच्या 'या' भागात 'धक्कादायक' प्रकार

Ahmednagar: सैनिकाला मारहाण..; नगरच्या ‘या’ भागात ‘धक्कादायक’ प्रकार

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री-

सैनिकाच्या पत्नी विषयी समाजात वाईट बोलून त्यांची बदनामी केली. याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या सैनिकाला मारहाण करण्यात आली. गुरूवारी (दि. ३०) रात्री साडे आठच्या सुमारास सावेडी उपनगरात हा प्रकार घडला. या प्रकरणी सैनिकाच्या पत्नीने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी तिघांविरोधात विनयभंग, मारहाण कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

जाकीर पत्रकार, त्याची पत्नी (पूर्ण नावे माहिती नाही, रा. तपोवन रस्ता) व एका मुलीविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे पती सैन्य दलात नोकरीला आहेत. ते नोकरीच्या ठिकाणी वास्तव्यास असतात. फिर्यादी, त्यांची मुलगी व आई उपनगरात राहतात. फिर्यादीच्या पतीला सुट्टी असल्याने ते घरी आले आहेत. जाकीर पत्रकार हा फिर्यादी विषयी समाजात नेहमी वाईट बोलत असतो. बर्‍याच वेळा त्यांचा घरापर्यंत पाठलाग करून त्यांच्या विषयी चौकशी करत असतो.

याबाबत फिर्यादी यांनी त्यांच्या पतीला फोनवरून माहिती दिली होती. गुरूवारी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी कुटुंबासह कामानिमित्त बाहेर जात असताना त्यांनी त्यांचे वाहन थांबवून जाकीर पत्रकार याला जाब विचारला. त्याचा राग आल्याने जाकीर पत्रकार याच्यासह तिघांनी फिर्यादीच्या पतीला मारहाण केली. फिर्यादीसह मुलीला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पुढचे ५ दिवस महत्वाचे, पावसाचा जोर वाढणर; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

मुंबई | नगर सहयाद्री राज्यात पावसाचा जोर वाढत असून पुढचे पाच दिवस हवामानाच्या दृष्टीने...

नगर जिल्ह्यातील दिंडी सोहळ्याला पिकअपची धडक; वारकरी जखमी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथून पंढरपूरकडे जाणार्‍या श्री दत्त सेवा पायी दिंडीच्या...

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...