अहिल्यानगर | नगर सह्याद्री
कायनेटिक चौक परिसरातील काही भागात गेल्या 1 महिन्यापासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यांची स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी गंभीर दखल घेत तात्काळ उपाययोजना करण्याबाबतचे निवेदन आयुक्त यशवंड डांगे यांना दिले आहे.
डिमळे मळा, सुभद्रानगर, अजय गॅस गोडावून मागील भाग येथील शेकडो कुटुंबांना दूषित पाणीपुरवठा होत असून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कायनेटिक चौकातील शगुन ज्वेलर्स समोरील ड्रेनेजची पाईप जिर्ण झाल्यामुळे सांडपाणी साचून तेथून पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये मिसळत असल्याचे निदर्शनास आले आहे.
परिणामी या भागात कावीळ, हिवताप यांसारख्या आजारांचे रुग्ण वाढत असून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. याबाबत संबंधित प्रभागातील नागरिकांनी महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार केली असून, तात्काळ उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी मनोज कोतकर यांनी केली आहे.