CM Adityanath Yogi News: अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाचा २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यापूर्वीच दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने CM आदित्यनाथ योगी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
धमकी देणाऱ्या व्हॉईस रेकॉर्डिंग मध्ये म्हटले आहे की, 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटना सोहळ्याच्या वेळी तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही, गरज पडल्यास राजकीय हत्या करू. SFJ यावर 22 जानेवारीला उत्तर देईल.
धमकी देणाऱ्या व्हॉईस रेकॉर्डिंग युनायटेड किंगडम (यूके) मधील एका ठिकाणाहून आले असल्याची माहिती समोर आली असून याप्रकरणी गुरुवार दि. १८ रोजीरोजी अयोध्येतून ३ संशयितांना अटक करण्यात आली आहे.